पंढरपूर : राज्यात संभाव्य गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अवैध साठा आणि गैरवापर रोखण्यासाठी कारवाईची मोहीम सुरू केली आहे. पंढरपूर आणि गों

पंढरपूर : राज्यात संभाव्य गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अवैध साठा आणि गैरवापर रोखण्यासाठी कारवाईची मोहीम सुरू केली आहे. पंढरपूर आणि गोंदिया जिल्ह्यांत घरगुती गॅस सिलिंडरचा अवैध वापर उघडकीस आला असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पंढरपूरमधील सांगोला नाका परिसरात घरगुती गॅस सिलिंडरमधून रिक्षामध्ये अवैधरीत्या गॅस भरून विक्री केली जात असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार केलेल्या धाडीत गणेश बोरीकर या व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईदरम्यान घरगुती वापराच्या आठ आणि व्यावसायिक वापराच्या पाच अशा एकूण तेरा गॅस टाक्या जप्त करण्यात आल्या. संबंधित आरोपीविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियमातील कलम 3 आणि 7 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अवैध विक्रीसाठी गॅसचा पुरवठा कोणत्या एजन्सीकडून होत होता याचाही तपास सुरू असून दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, गोंदिया जिल्ह्यातही घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याचे आढळून आले. जिल्हा प्रशासनाने गोंदिया आणि तिरोडा येथील दोन हॉटेलांवर धाड टाकून सात सिलिंडर जप्त केले. काही ठिकाणी संभाव्य गॅस तुटवड्याच्या अफवांमुळे हॉटेल व्यावसायिकांकडून घरगुती सिलिंडरचा वापर केल्याचे निदर्शनास आले आहे.

COMMENTS