Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवसेनेशी युतीची शक्यता आता मावळली- मुनगंटीवार

नागपूर : नारायण राणे यांना अटक केल्यामुळे भाजपा आणि शिवसेनेतील संबंध चांगलेच ताणले गेले असून दोन्ही पक्ष एकमेकांपासून दुरावल्याचे स्पष्ट झाले आहे

किरीट सोमय्यांचा दावा… उद्धव ठाकरेंच्या ‘या’ मंत्र्यांच्या बांधकामावर पडणार हातोडा…
दोन्ही डोस घेतलेल्यांना १५ ऑगस्टपासून रेल्वे प्रवासाची मुभा : मुख्यमंत्री
एएनएम आणि जीएनएम अभ्यासक्रमांसाठी सीईटी नाही : वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

नागपूर : नारायण राणे यांना अटक केल्यामुळे भाजपा आणि शिवसेनेतील संबंध चांगलेच ताणले गेले असून दोन्ही पक्ष एकमेकांपासून दुरावल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता शिवसेनेशी युती होण्याचा प्रश्नच येत नसल्याचे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी मुनगंटीवार म्हणाले की, या प्रकरणामुळे भाजप कार्यकर्त्यांच्या भावना खूप तीव्र आहेत. राणेंवर अटकेची कारवाई होणे चुकीचेच आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून राणेंवर कारवाई करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केले पाहिजे, अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही यापूर्वी थोबाड फोडीन सारखी अनेक वक्तव्ये केली आहे. पण भाजपाचा त्यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्याचा कोणताही विचार नाही. एका केंद्रीय मंत्र्याला अटक करण्याची शिवसेनेची कृती चुकीची असून त्यांनी संविधनाचा अपमान केला आहे. केंद्रीय मंत्र्याला अटक करून सेनेने स्वार्थी राजकारण दाखवून दिल्याचा आरोप मुनगंटीवार यांनी केला. अंधेर नगरी चौपट राजा असा कारभार असून सेनेची कृती म्हणजे विनाशकाले विपरित बुद्धी आहे. अशा प्रकारे वागणे म्हणजे सत्तेची मस्ती चढल्याचे लक्षणे असून ही तालीबानी प्रवृत्तीने केलेली कारवाई आहे. हे लक्षात घेता आता जनताच शिवसेनेला धडा शिकवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यापूर्वी राज्यपालांना निर्लज्ज म्हटले, कोणाला अटक झाली नाही, मोदींना अफझल खान म्हटले, कोणाला अटक झाली नाही, उदयन राजे छत्रपतींचेच वंशज का असा सवाल केला तेव्हाही कोणाला अटक झाली नाही, देवेंद्र फडणवीस ह्यांच्या तोंडात कोरोनाचे जंतू कोंबू असे म्हटले त्यावेळी कोणाला अटक झाली नाही, एक थापड मारीन तर आयुष्याभर उठणार नाही हे मुख्यमंत्र्यांनी म्हटले, तेव्हाही कोणाला अटक केली नाही. तसेच 19 जून रोजी शिवसेनेचा स्थापना दिन कार्यक्रम आणि राहुल गांधी यांच्या वाढदिवशी काँग्रेस जोडे खाईल? अशी भाषा वापरली. का तर स्वबळाची भाषा केली म्हणून. ही राजकीय झुंडशाही आहे. राजकारणाचे गुंडशाहीकरण बघितले होते आता गुंडांचे राजकीयकारण झाले आहे. कौरवांची सत्ता थोड्या काळासाठी चालेल असे टीकास्त्र मुनगंटीवार यांनी सोडले.

COMMENTS