नगरचे पोलिस राणेंना अटक करणार की नाही?; वरिष्ठांच्या आदेशानंतर पुढील कारवाईचे पोलिस निरीक्षकांचे संकेत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरचे पोलिस राणेंना अटक करणार की नाही?; वरिष्ठांच्या आदेशानंतर पुढील कारवाईचे पोलिस निरीक्षकांचे संकेत

अहमदनगर/प्रतिनिधी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अवमानजनक वक्तव्य केल्याबद्दल केंद्रीय लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांन

फडणवीस व त्यांच्या पक्षाने गांजाच्या शेतात बागडायचे ठरवलेच असेल तर..’ l LokNews24
सोयीचे राजकारण
जुन्या व्हायरसचा बंदोबस्त करणार ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता राणेंना लगावला टोला

अहमदनगर/प्रतिनिधी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अवमानजनक वक्तव्य केल्याबद्दल केंद्रीय लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली असली व त्यानंतर त्यांची जामीनावर सुटका झाली असली तरी नगरच्या कोतवाली पोलिस ठाण्यातही राणेंविरोधात गुन्हा दाखल असल्याने या गुन्ह्यात नगरचे पोलिस राणेंना कधी अटक करणार, असा सवाल आता उपस्थित होत आहे. दरम्यान, वरिष्ठांच्या आदेशानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे कोतवालीचे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरला प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात नगर येथे मंगळवारी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरचे पोलीस यासंदर्भात आता पुढील काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे. राणेंविरोधात मंगळवारी पहाटे नाशिकला गुन्हा दाखल झाल्यानंतर नाशिक पोलिसांचे पथक त्यांना अटक करण्यासाठी कोकणाकडे रवाना झाले होते. कोकणात राणेंच्या सुरू असलेल्या जनआशीर्वाद यात्रेत त्यांना अटक करण्याचे नाशिक पोलिसांचे नियोजन होते. पण त्याआधीच रत्नागिरी पोलिसांनी त्यांना संगमेश्‍वरला अटक केल्याने आता नाशिक पोलिसांनी राणेंना 2 सप्टेंबरला नाशिकला चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. राणेंना 15 सप्टेंबरपर्यंत अटक करणार नसल्याचे राज्य सरकारनेच स्पष्ट केल्याने आता नाशिकचे पोलिस त्यांना फक्त चौकशीला बोलावणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर नगरला दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना कधी चौकशीला बोलावले जाते, याची उत्सुकता व्यक्त होत आहे. या संदर्भामध्ये कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मानगावकर यांच्याशी संपर्क साधला असता, राणेंविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यासंदर्भात वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही पुढील कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, नाशिक पोलिसांनी जसे राणेंना चौकशीला बोलावले आहे, त्याच पद्धतीने नगरचे पोलिसही त्यांना येथे दाखल असलेल्या गुन्ह्याबाबत चौकशीला बोलावण्याची शक्यता आहे. त्यामुळेच नगरचे पोलिस नेमकी काय भूमिका घेणार, याची उत्सुकता व्यक्त होत आहे.

नगरसह चार ठिकाणी गुन्हे
केंद्रीय मंत्री राणे यांना मंगळवारी अटक होऊन त्यांना जामीन मिळालेला होता. त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल राज्यामध्ये चार ठिकाणी वेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामध्ये नगर येथेही गुन्हा दाखल असून, येथील शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे व शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी कोतवाली पोलिस ठाण्यांमध्ये येऊन या संदर्भामध्ये फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार येथील कोतवाली पोलिस ठाण्यांमध्ये राणे यांच्यावरुद्ध कलम 500 ,505(2),153.इ (1)(उ) या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

COMMENTS