Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

इराणने आत्मसमर्पण करावे, अन्यथा परिणाम भयंकर : ट्रम्प

वॉशिंग्टन : इस्रायल आणि अमेरिकेकडून इराणवरील हल्ले सुरूच असून या संघर्षाचा नववा दिवस सुरू झाला आहे. तरीही युद्ध थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नस

अमेरिकेची युद्धनौका तेहरानच्या दिशेने; मध्यपूर्वेवर युद्धाचे ढग?
व्हेनेझुएलावर हल्ला आणि ट्रम्प यांचा दुटप्पीपणा !
भारत-अमेरिका व्यापार करार
The current image has no alternative text. The file name is: america-isreal-vs-iran-war-191_2026021654434.jpg

वॉशिंग्टन : इस्रायल आणि अमेरिकेकडून इराणवरील हल्ले सुरूच असून या संघर्षाचा नववा दिवस सुरू झाला आहे. तरीही युद्ध थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने तणाव अधिक तीव्र झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक शब्दांत इशारा दिला आहे. इराणने तात्काळ आत्मसमर्पण करावे, अन्यथा परिस्थिती इतकी गंभीर होईल की नंतर शरण येण्यासाठी कोणी उरणारही नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांनी सांगितले की, इराणच्या लष्करी क्षमतेवर मोठा आघात करण्यात आला आहे. त्यांच्या अनेक नौदल जहाजांचा नाश करण्यात आला असून हवाई दलातील विमानेही निष्क्रिय करण्यात आली आहेत. तसेच क्षेपणास्त्र निर्मिती केंद्रांवरही जोरदार हल्ले करण्यात आले असून त्यामुळे इराणची ड्रोन आणि क्षेपणास्त्र क्षमता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे, असा दावा त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, इराणच्या सैन्यावर आणखी मोठी कारवाई करण्याची क्षमता अमेरिकेकडे आहे. मात्र त्याबाबत अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, इराणनेही या संघर्षातून माघार घेण्यास नकार दिला आहे. सर्वोच्च नेते अयातोल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूचा बदला घेतल्याशिवाय अमेरिका आणि इस्रायलविरुद्धचा संघर्ष थांबवणार नाही, अशी भूमिका इराणने पुन्हा स्पष्ट केली आहे. तथापि, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांनी शनिवारी शेजारी देशांवर झालेल्या हल्ल्यांबाबत खेद व्यक्त केला. इराणी कारवाईमुळे प्रभावित झालेल्या देशांची वैयक्तिकरित्या माफी मागत त्यांनी खाडी परिसरातील राष्ट्रांना आवाहन केले की त्यांनी अमेरिका आणि इस्रायलसोबत मिळून इराणविरोधी लष्करी कारवाईत सहभागी होऊ नये. इराणच्या तात्पुरत्या नेतृत्व परिषदेनेही एक भूमिका स्पष्ट केली आहे. शेजारी देशांच्या भूमीवरून इराणवर हल्ला झाला नाही, तर त्या देशांना लक्ष्य केले जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. प्रादेशिक तणावाचे समाधान अखेरीस कूटनीती आणि चर्चेच्या माध्यमातूनच शक्य असल्याचेही इराणकडून नमूद करण्यात आले.

COMMENTS