अंबाजोगाई । प्रतिनिधीसाहित्यिक अपर्णा संजय कुलकर्णी यांच्या चारोळी संग्रह कार्वी चा प्रकाशन सोहळा धाराशिव येथील स्वयंवर मंगल कार्यालयात संपन्न झा
अंबाजोगाई । प्रतिनिधी
साहित्यिक अपर्णा संजय कुलकर्णी यांच्या चारोळी संग्रह कार्वी चा प्रकाशन सोहळा धाराशिव येथील स्वयंवर मंगल कार्यालयात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्रातील चारोळी सम्राट चंद्रशेखर गोखले व उमा गोखले यांनी केले, तसेच ज्येष्ठ साहित्यिक रेखा ढगे उपस्थित होत्या.
अपर्णा कुलकर्णी यांनी आपल्या कवितासंग्रहाच्या माध्यमातून पर्यावरण जागृती, नातेसंबंध, रक्तदान, एकात्मता यासह समाज जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या सायली संस्कार केंद्राद्वारे मुलांवर संस्कार करतात आणि कार्वी या संग्रहाद्वारे समाजप्रबोधनाचा संदेश देत आहेत. या प्रकाशन सोहळ्यावर महाराष्ट्रातील ज्येष्ठ लेखिका डॉ. अश्विनी निवर्गी, नागपूरच्या डॉ. सीमा पांडे, अंबाजोगाईच्या विजया चपळगावकर, उषाबाई कुलकर्णी, सायली पियुष वेदालंकार, सुमन वेदालंकार, राम कुलकर्णी, कल्याण कुलकर्णी आणि जय हिंद ग्रुप यांनी अपर्णा कुलकर्णी यांचे अभिनंदन केले.

COMMENTS