Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रयत सामाजिक प्रतिष्ठानचा 16वा पुरस्कार वितरण सोहळा 2026 थाटात संपन्न

सामाजिक, सांस्कृतिक व कला क्षेत्रातील मान्यवरांचा गौरवबीड । प्रतिनिधीसामाजिक, सांस्कृतिक तसेच कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना प

मी ज्या भागात घडलो तेथे माझा सन्मान होत आहे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे -: डॉ.गणेश चंदनशिवे
Beed : बीड जिल्ह्यासह केज तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी
भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखा; शिवसेनेचा नगरपालिकेवर आंदोलनाचा इशारा

सामाजिक, सांस्कृतिक व कला क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव
बीड । प्रतिनिधी
सामाजिक, सांस्कृतिक तसेच कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना प्रोत्साहन व प्रेरणा देण्याच्या उद्देशाने रयत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेला 16वा पुरस्कार वितरण सोहळा – 2026 येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे अत्यंत भव्य व दिमाखदार वातावरणात संपन्न झाला.
प्रतिष्ठानच्या रोहिणीताई गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे नियोजन प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुलोचना माने व शुभांगी माने यांनी केले होते. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते राजेश दादा खर्डे (वेसावकर) यांची पारंपरिक कोळी वेशातील दमदार एन्ट्री. यावेळी प्रतिष्ठान अध्यक्षा द्रौपताबाई पठारे, ज्येष्ठ समाजसेवक कैलास दादा पठारे, विठ्ठल मूर्तीवार, मंजू ताई पठारे, बंडोपंत सोळुंके, चित्रपट मंडळाचे प्रशांत होर्शीळ, समाजसेवक सुशीलजी खटोड, एम.एस. कन्स्ट्रक्शनचे संचालक साथीराम अण्णा ढोले, ओबीसी फाउंडेशनचे लक्ष्मण लटपटे, अहिल्यानगर येथील संतोष अवताडे, तसेच सोशल मीडियावर लोकप्रिय इंस्टाग्राम रील स्टार लखन चव्हाण, ओम पावले, खंडू तात्या आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणार्‍या मान्यवरांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. सन्मानितांमध्ये प्रमोद रामदासी, लक्ष्मीकांत रुईकर, आदिम राज बहुउद्देशीय संस्थाचे रामू मोते, सुशील हरिभाऊ कोळेकर, पसायदान सेवा केंद्रचे गोवर्धन दराडे, सरोज आनंदकर (नागपूर), संगीता माने (क्राईम ब्रँच, मुंबई), प्रमोद गोरक्षनाथ चांदणे, प्राची चांदणी, देविदास उत्तम शेलार व नयना रतन कानडे यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन गणेश तालखेडकर यांनी केले. प्रतिष्ठानचे सदस्य गणेश माने, किशोर कुलकर्णी, प्रकाश देवा, जाकीर भाई, विकास धोत्रे, गुड्ड्या जोगदंड, महादेव सवाई, मीनाक्षी देवकते, नयना भाकरे, नेहा साबळे व इतर सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. भव्य-दिव्य वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याच्या शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार मानत कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. रयत सामाजिक प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणार्‍या व्यक्तींना नवी ऊर्जा व प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

COMMENTS