Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संत गाडगेबाबांनी शिक्षणाचा पुरस्कार करत माणूस बनण्याचा संदेश दिला – डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड

केज । प्रतिनिधीस्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता.केज जि.बीड येथे दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी संत गाडगेबाबा जयंती साधेपणाने साजरी करण्यात आल

महापालिकेत भाजपचे ‘कमळ’ फुलले
महाराष्ट्राची ऐतिहासिक विजयगाथा; जनादेशाचा सन्मान – श्री. शांत प्रकाशजी जाटव
विकासपर्वाचा वेग! जीवाचीवाडी ते रानुबाईचीवाडी रस्त्याचे काम युद्धपातळीवर

केज । प्रतिनिधी
स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता.केज जि.बीड येथे दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी संत गाडगेबाबा जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली.सर्व प्रथम संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पुजन करून वंदन करण्यात आले. प्रमुख उपस्थिती एस.के. वैरागे,आर्यन गायकवाड, सुशांत सौदागर,ज्ञानेश्वर गायकवाड,कमलाकर साबळे,जनार्धन गायकवाड,विक्रम गायकवाड,बबन गायकवाड,रामकृष्ण तात्या गायकवाड यांची उपस्थिती होती. अध्यक्षीय समारोप ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष,जेष्ठ विचारवंत, जेष्ठ समाजसेवक, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते व परखडव्याख्याते, प्राचार्य,डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केला. संत गाडगेबाबांनी शिक्षणातून माणूस बनण्याचा संदेश दिल्याचे प्रतिपादन डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केले.दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या. खेळ हा जीवनाचा अविभाज्य भाग बनावा व आपले क्रियाक्षेत्रातही श्रेष्ठत्व सिध्द करावे असे आवाहन बक्षीस वितरण समयी डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केले.

COMMENTS