मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख, एकनाथ खडसे यांच्या अंमलबजावणी संचलनालय (ईडी) चौकशीनंतर सोमवारी राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते प्रफुल्ल पटेल यांची चौ
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख, एकनाथ खडसे यांच्या अंमलबजावणी संचलनालय (ईडी) चौकशीनंतर सोमवारी राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते प्रफुल्ल पटेल यांची चौकशी करण्यात आली. सीजे हाऊस प्रकरणात ही चौकशी होत आहे. ईडीने यापूर्वी 2019 मध्ये प्रफुल्ल पटेल यांची तब्बल 12 तास कसून चौकशी केली होती. याच प्रकरणात ईडी पुन्हा चौकशी करत असल्याचे बोलल्या जात आहे. 2019 मध्ये कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा सहकारी इक्बाल मिर्ची याच्या पत्नीसोबत करण्यात आलेल्या आर्थिक व्यवहारप्रकरणी ईडीने प्रफुल्ल पटेल यांना समन्स बजावले होते. पटेल यांच्या कुटुंबाची मालकी असेलल्या मिलेनियम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून इक्बाल मेमन याला एक प्लॉट देण्यात आला होता. हा प्लॉट वरळीमधील नेहरू तारांगणच्या समोर आहे. याच ठिकाणी मिलेनियम डेव्हलपर्सने 15 मजली इमारत उभी केली आहे. त्याचे नाव सीजे हाऊस असे ठेवण्यात आले आहे. दरम्यान ईडीने सीजे हाऊस इमारतीचा तिसरा आणि चौथ मजला जप्त केला आहे. ही इक्बाल मिर्चीची मालमत्ता असल्याचे सांगितले जाते. याच प्रकरणात आर्थिक गैरव्यवहारप्रकर झाल्याची देखील केस आहे. यासंदर्भात ईडीने पटेल यांची चौकशी केली.
COMMENTS