Homeताज्या बातम्यादेश

तिरुपती मंदिरात बायोडिग्रेडेबल बॅगचा वापर सुरू

तिरुपती: दक्षिणेसह देशातील एक सर्वांत श्रीमंत तिरुपती बालाजी मंदिरात प्लास्टिकचा वापर बंद होणार आहे. कारण येथे येणाऱ्या भक्तांना मिळणारा प्रसाद आ

थोरातांकडे येणार प्रदेश काँगे्रसची सुत्रे ?
शेअर बाजार वधारला ; सेन्सेक्स 62 हजारांवर
सॅल्युट! एका झाडासाठी वादळाशी लढला तरूण; अंगावर काटा आणणारा VIDEO l LOK News 24

तिरुपती: दक्षिणेसह देशातील एक सर्वांत श्रीमंत तिरुपती बालाजी मंदिरात प्लास्टिकचा वापर बंद होणार आहे. कारण येथे येणाऱ्या भक्तांना मिळणारा प्रसाद आता बायोडिग्रेडेबल बॅगेत मिळणार आहे. या संदर्भात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) तिरूपती मंदिरात बायोडिग्रेडेबल बॅग वितरण सुरू केले आहे. सध्या हा उपक्रम प्रायोगिक स्तरावर सुरू करण्यात आला आहे.

डीआरडीओचे अध्यक्ष सतीश रेड्डी, तिरुमला देवस्थान समितीचे कार्यकारी अधिकारी डॉ के.एस.रेड्डी आणि ए. व्ही. धर्म रेड्डी यांनी रविवारी येथे एका विशेष विक्री कक्षाचे उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांना याबाबत माहिती दिली. पर्यावरणाशी सुसंगत गोष्टी बनवण्यासाठी संशोधन सुरू डीआरडीओच्या रेड्डी यांनी सांगितले की, हैद्राबादमध्ये डीआरडीओच्या अत्याधुनिक बायोडिग्रेडेबल बॅग बनवण्यासाठी अनेक संशोधन आणि प्रयोग केले आहेत. पर्यावरणाशी सुसंगत अशा गोष्टी बनवण्यासाठी डीआरडीओचे संशोधन अजूनही सुरू आहे. ९० दिवसांनंतर बॅग आपोआप पर्यावरणात मिसळते प्लास्टिकचा एकदा वापर करण्याची पद्धती कमी करून आम्ही कॉर्न स्टार्चपासून पर्यावरणपूरक बॅग घेऊन आलो आहोत. ही बॅग ९० दिवसांनंतर आपोआप खराब होते. तसेच पर्यावरणात मिसळून जाते. जनावरांनी ही बॅग खाल्ली तरी काहीही अडचण येत नाही. पेट्रोकेमिकल्सपासून बनवण्यात आलेल्या पॉलिथिन बॅग पर्यावरणासाठी विषारी असतात. त्यांना नष्ट व्हायला २०० वर्षे लागतात. मानव जातीच्या अस्तित्वासाठी गरजेचे बायोडिग्रेडेबल बॅगची सुरुवात एक पर्यावरणपूरक पर्याय आहे. हे प्रोडक्ट मानव जातीच्या अस्तित्वासाठी गरजेचे आहे. काही दिवस भक्तांची प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर याची विक्री पूर्ण क्षमतेने सुरू करणार असल्याचेही डॉ. रेड्डी यांनी म्हटले आहे.

COMMENTS