Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वच्छ, सुंदर बीडसाठी आ. विजयसिंह पंडित यांचा पुढाकार!

शिवजयंती व रमजान सणाच्या पार्श्वभुमीवर विशेष स्वच्छता मोहिम; स्वच्छता, विद्युत व पाणी पुरवठा विभागाच्या बैठकीत निर्णय बीड । प्रतिनिधी छत्रपती शिवाजी म

शेतकरी संकटाच्या खाईत असताना लाखो रुपयाची उधळ पट्टी कशासाठी
आदित्य पॉलीटेक्निकच्या दोन विद्यार्थींची भारतीय नौदलात निवड
श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे गोविंद महाराज नाईकवाडे यांचे कीर्तन

शिवजयंती व रमजान सणाच्या पार्श्वभुमीवर विशेष स्वच्छता
मोहिम; स्वच्छता, विद्युत व पाणी पुरवठा विभागाच्या बैठकीत निर्णय
बीड । प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने व मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरु होत असल्याने स्वच्छ, सुंदर बीडसाठी आ. विजयसिंह पंडित यांनी पुढाकार घेतला आहे.  नगर पालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रीमती प्रेमलताताई पारवे, उपाध्यक्ष विनोद मुळूक, नगराध्यक्ष प्रतिनिधी शेख मुजीब यांच्यासह पदाधिकार्‍यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत आ. विजयसिंह पंडित यांनी स्वच्छता, विद्युत व पाणी पुरवठ्याच्या आढावा बैठकीत शहरात विशेष स्वच्छता मोहिम प्रभागनिहाय सुरु करून बंद असलेले पथदिवे तात्काळ दुरुस्त करावेत, आवश्यक ठिकाणी नव्याने लाईट बसविण्यात यावेत, शहरातील नळ पाणी पुरवठा वेळेत करण्यात यावा, पाणी सुटण्याचे वेळापत्रक नागरीकांना कळविण्यात यावेत अशा सूचना पालिका प्रशासनाला दिल्या आहेत. यावेळी मुख्याधिकारी शैलेश  फडसे गटनेते फारुक पटेल, स्वच्छता सभापती शेख निजाम, नगरसेवक मोईन मास्टर, नगरसेवक अमर नाईकवाडे यांची उपस्थिती होती. शनिवार, दि.7 फेब्रुवारी रोजी बीड नगर परिषदेच्या स्वच्छता, विद्युत व पाणी पुरवठा विभागाचा आढावा घेण्यात आला, यावेळी ते पालिका प्रशासनाशी बोलत होते. शहरातील जनतेने विकासासाठी भरभरून आशिर्वाद दिलेले आहेत, त्यामुळे आता शहरातील जनतेला पालिकेच्या माध्यमातून मुलभूत सुविधा मिळायलाच हव्यात, या सुविधा मिळवून देण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत. रस्ते, नाल्या व पाणी पुरवठ्याबरोबरच शहरातील स्वच्छता नियमित होणे महत्वाचे आहे. यासाठी ही विशेष मोहिम राबवणे गरजेचे आहे, यात कसलीही दिरंगाई नको अशा सूचना त्यांनी यावेळी पालिका प्रशासनाला केल्या. जनतेने निवडून दिलेल्या नगरसेवकांच्या जनहिताच्या कामांकडे कर्मचार्‍यांनी दुर्लक्ष करता कामा नये. स्वच्छता, विद्युत व पाणी पुरवठ्याच्या संदर्भात कसलाही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असे कडक निर्देश त्यांनी दिले आहेत. यावेळी उपस्थित नगरसेवकांनी आपल्या सूचना, प्रश्न या बैठकीत मांडले. या बैठकीला ज्येष्ठ नगरसेवक सादेक अली, अशफाक इनामदार, जैतुल्ला खान, महेश धांडे, सय्यद इलियास, रंजित बनसोडे, जकी सौदागर, प्रमोद शिंदे, शेख बिलाल, शेख खय्युम, भैय्यासाहेब मोरे, शाहेदभाई पटेल यांच्यासह पाणी पुरवठा अभियंता प्रमोद माने, विद्युत अभियंता उदय इपिल्ली, विजय गाडेकर, स्वच्छता विभाग प्रमुख गणेश पगारे, स्वच्छता निरीक्षक भागवत जाधव, भारत चांदणे, शशिकांत जोगदंड यांच्यासह कर्मचार्‍यांची उपस्थिती होती.
घंटागाडी, ट्रॅक्टर व जेसीबींना जीपीएस, नगरसेवकांकडे बॅकअप
बीड शहरात 25 प्रभाग आहेत, या प्रभागात सध्या 35 घंटागाड्या कार्यरत आहेत, परंतु तरीही शहरातील कचरा उचलल्या जात नाही यामुळे घंटागाडी स्वच्छतेचे ढिगारे उचलणारे ट्रॅक्टर, जेसीबी यांना जीपीएस सिस्टीम बसवून त्याचे बॅकअप संबंधित प्रभागात असलेल्या नगरसेवकांकडे दिले जाणार आहे, त्यामुळे त्यांच्या प्रभागात संबंधित घंटागाडी किंवा जेसीबी, ट्रॅक्टर आला की नाही हे समजेल. प्रभागात स्वच्छता विभागाचे कामगार येण्या अगोदर त्याची पूर्व कल्पना नगरसेवकांना व संबंधित नागरीकांना पालिकेकडून दिली जाणार आहेत.

COMMENTS