सादिकच्या मृत्यूचे गूढ आज उकलणार; पोलिस अधीक्षकांकडे आला अहवाल, तपास सीआयडीकडे वर्ग

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सादिकच्या मृत्यूचे गूढ आज उकलणार; पोलिस अधीक्षकांकडे आला अहवाल, तपास सीआयडीकडे वर्ग

अहमदनगर/प्रतिनिधी-पोस्कोच्या गुन्ह्यातील आरोपी सादिक बिराजदार याच्या मृत्यूचे गूढ सोमवारी (23 ऑगस्ट) उकलणार आहे. या प्रकरणी दाखल असलेल्या दोन फिर्यां

मुळा 40 टक्के तर भंडारदरा निम्मे भरले ; पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम
पाथर्डी तालुक्यातुन उसाच्या शेतातून पोलिसांनी केला लाखो रुपयांचा गांजा जप्त
अहमदनगर मध्ये मोहरम विसर्जन मिरवणूक होणार नाही| LokNews24

अहमदनगर/प्रतिनिधी-पोस्कोच्या गुन्ह्यातील आरोपी सादिक बिराजदार याच्या मृत्यूचे गूढ सोमवारी (23 ऑगस्ट) उकलणार आहे. या प्रकरणी दाखल असलेल्या दोन फिर्यांदींपैकी कोणती नेमकी खरी आहे, यासंदर्भातील चौकशी अधिकार्‍यांचा प्राथमिक अहवाल पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे आला आहे व ते त्याबाबतची माहिती प्रसिद्धी माध्यमांसमोर स्पष्ट करणार आहेत. दरम्यान, सादिकच्या मृत्यूप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून, या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे.

भिंगार कॅम पोलिस ठाण्यातील दाखल पोस्कोच्या गुन्ह्यातील आरोपी सादिक लाडलेसाब बिराजदार याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाची गुंतागुंत वाढली आहे. याबाबत दोन स्वतंत्र फिर्यादी व दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले असल्यामुळे व त्याची चौकशी सुरू असल्यामुळे नेमका त्याचा मृत्यू कशामुळे झाला, याचे गूढ वाढले आहे. तो पोलिसांच्या ताब्यात असताना पोलिसांच्या गाडीतून पळून जाण्याच्या प्रयत्नात जखमी होऊन त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पण, त्याच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार त्याच्या विरुद्धच्या पोस्को गुन्ह्यातील फिर्यादींनी तो पोलिसांच्या ताब्यात असताना त्याला मारहाण केल्याने त्यामध्ये जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला, असे तिचे म्हणणे आहे. या पार्श्‍वभूमीवर त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

आज माहिती देणार

यासंदर्भात पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सादिकच्या मृत्यू संदर्भात दाखल दोन गुन्ह्यांच्या चौकशीसाठी नेमलेल्या उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या समितीचा प्राथमिक अहवाल आला असून, त्याची माहिती सोमवारी (23 ऑगस्ट) प्रसिद्धी माध्यमांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. सादिकच्या शवविच्छेदनाचाही प्राथमिक अहवाल आला असून, त्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. शवविच्छेदनाचा सविस्तर अहवाल अद्याप आलेला नाही व चौकशी समितीचाही पूर्ण अहवाल आलेला नाही. मात्र, प्राथमिक अहवालानुसार नेमके काय घडले, याची माहिती प्रसिद्धी माध्यमांना दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सादिकचा मृत्यू पोलिसांच्या ताब्यात असताना झाला असल्याने या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

स्वातंत्र्यदिनी सायंकाळी भिंगार कॅम्प पोलिसांनी सादिकला पोस्को अंतर्गत दाखल गुन्ह्यामध्ये ताब्यात घेतले होते. पोलीस ठाण्यात नेत असताना सादिकने भिंगार नाल्याजवळ गाडीतून उडी मारुन पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचा दावा करत तसा गुन्हा पोलिसांनी दाखल केलेला आहे. या प्रयत्नात तो जखमी झाल्यामुळे त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, सादिक याची पत्नी रुक्सार यांनी आपल्या पतीला पोलीस ठाण्यात नेत असताना भिंगार नाल्याजवळ पाच जणांनी त्याला पोलिस गाडीतून बाहेर काढून मारहाण केल्याचा आरोप करत, तशी फिर्याद दिली आहे. त्यानुसारही भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या दोन्ही घटनांपैकी सत्य घटना कोणती, हे पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतर समोर येणार आहे. यासंदर्भात पोलीस उपाधीक्षक ढूमे यांच्यामार्फत चौकशी सुरू आहे. त्या चौकशीचा अहवाल पोलिस अधीक्षक पाटील सोमवारी जाहीर करणार असल्याने सादिकचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट होणार आहे.

र्गादायरामध्ये अंत्यसंस्कार

15 ऑगस्टला सायंकाळी ही घटना घडल्यानंतर जखमी सादिकला खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना सहा दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन पुणे येथे करण्यात आले. शवविच्छेदनानंतर शनिवारी मध्यरात्री त्याचा मृतदेह नगरला आणण्यात आला व रविवारी पहाटे साड़ेतीनच्या सुमारास दर्गादायरा येथील कब्रस्थानात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्याच्या कुटुंबातील सदस्य व नातेवाईक उपस्थित होते. पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.

COMMENTS