Homeताज्या बातम्यालाईफस्टाईल

झोपताना ‘या’ चुका टाळा-डॉ.जगदीश टेकाळे

बीड । प्रतिनिधी निरोगी आरोग्यासाठी चांगली झोप अत्यंत आवश्यक आहे. मात्र अनेकदा कळत-नकळत आपण काही चुकीच्या सवयी अंगीकारतो. त्यामुळे झोपेची गुणवत्ता कमी

विकसित महाराष्ट्राच्या वाटचालीत पर्यावरणीय समृद्धतेची प्रतिज्ञा : मुख्यमंत्री फडणवीस
सोसायटयांचं रुपडं पालटणार
प्रवरा कारखान्याचा तीन हजार भाव, इतरांचे मात्र तोंडावर बोट

बीड । प्रतिनिधी
निरोगी आरोग्यासाठी चांगली झोप अत्यंत आवश्यक आहे. मात्र अनेकदा कळत-नकळत आपण काही चुकीच्या सवयी अंगीकारतो. त्यामुळे झोपेची गुणवत्ता कमी होतेच, शिवाय आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो. झोपताना टाळावयाच्या काही महत्त्वाच्या चुका पुढीलप्रमाणे आहेत, असे मत मानसोपचार तज्ञ डॉ. जगदीश टेकाळे यांनी व्यक्त केले.
काही लोकांना पोटावर झोपण्याची सवय असते; मात्र ही पद्धत आरोग्यासाठी योग्य नाही. पोटावर झोपल्याने श्वसनलिकेवर दाब येतो आणि श्वासोच्छवासात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. तज्ज्ञांच्या मते, डाव्या कुशीवर झोपणे सर्वाधिक योग्य मानले जाते. झोप न लागल्यास अनेकजण स्वतःहून औषधे घेण्यास सुरुवात करतात. ही सवय धोकादायक आहे. झोपेच्या गोळ्यांचा चुकीचा वापर श्वसन प्रणालीवर परिणाम करू शकतो तसेच गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नयेत. रात्री उशिरा जेवणे तसेच पचनास जड पदार्थांचे सेवन केल्यास झोपेवर परिणाम होतो. जड अन्न पचवण्यासाठी शरीराला अधिक मेहनत घ्यावी लागते, त्यामुळे गाढ झोप लागत नाही. त्यामुळे झोपण्याच्या 2-3 तास आधी हलके भोजन करणे उपयुक्त ठरते. आजकाल अनेकजण मोबाइल पाहता पाहता झोपतात किंवा फोन उशीजवळ ठेवतात. मोबाइलमधील निळा प्रकाश आणि रेडिएशन झोपेवर परिणाम करतो. तसेच नोटिफिकेशनमुळे झोपमोड होतो. त्यामुळे मोबाइल दूर ठेवून झोपावे आणि शक्य असल्यास सायलेंट मोड वापरावा. टीव्ही पाहता पाहता झोपण्याची सवयही झोपेसाठी हानिकारक आहे. स्क्रीनचा प्रकाश आणि आवाजामुळे मेंदूला पूर्ण विश्रांती मिळत नाही. त्यामुळे झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. झोपण्यापूर्वी टीव्ही बंद करून खोलीत शांतता व अंधार ठेवावा. ही माहिती डॉ. जगदीश श्रीराम टेकाळे (एम.बी.बी.एस., एम.डी. मानसोपचार, गोल्ड मेडलिस्ट), न्युरो सायकियाट्रिस्ट, व्यसनमुक्ती तज्ञ व सेक्सोलॉजिस्ट यांनी दिली. ते महिन्याच्या दुसर्‍या व चौथ्या रविवारी बीड शहरातील साई (गावते कॉम्प्लेक्स, डी.पी. रोड, डॉक्टर लाईन, बस स्टँडच्या मागे) येथे उपलब्ध असतात.

COMMENTS