माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कोरोना रुग्णांसाठी आणखी 110 बेडचे नियोजन

Homeमहाराष्ट्रसातारा

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कोरोना रुग्णांसाठी आणखी 110 बेडचे नियोजन

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत बेडची कमतरता लक्षात घेता मागील वर्षीच्या पहिल्या लाटेत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी ज्या प्रकारे मैदानात उतरून जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहून मदत केली.

नगरसह संगमनेर-कोपरगाव व श्रीरामपूरला वाढते रुग्ण
अपघाताची संख्या कमी करण्यासाठी इंटिग्रेटेड रोड ऑक्सिडेंट डेटाबेस अँड्रॉईड अ‍ॅप
नवी मुंबई, पनवेल महापालिकेकडून दिवाळी भेट


कराड / प्रतिनिधी : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत बेडची कमतरता लक्षात घेता मागील वर्षीच्या पहिल्या लाटेत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी ज्या प्रकारे मैदानात उतरून जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहून मदत केली. त्याप्रमाणेच सद्याच्या दुसर्‍या लाटेत सुध्दा आ. पृथ्वीराज चव्हाण कोरोना विरुध्दच्या लढाईत उतरले आहेत. त्यांनी वेळोवेळी प्रशासकीय आढावा बैठका घेतल्या व त्याप्रकारे योग्य ते नियोजन केले. सद्या बेडची उपलब्धतेची गरज लक्षात घेता आज एकाच दिवशी कराड येथे स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल येथे 50 बेडचे, वडगाव हवेली येथे 30 बेडचे व उंडाळे येथे 30 बेडचे असे एकूण 110 बेडची व्यवस्था कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून झाली आहे. हे उद्घाटन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते व पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. उदयसिंह पाटील, जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते जयवंतराव उर्फ बंडा नाना जगताप, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, प्रांताधिकारी उत्तमराव दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, पंचायत समिती सभापती प्रणव ताटे, नगरसेवक तथा शहर काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र माने, नगरसेवक इंद्रजीत गुजर, माजी नगरसेवक प्रदीप जाधव, अशोकराव पाटील, डॉ. प्रमोद  जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी, संगीता देशमुख, मंडलाधिकारी महेश पाटील, उंडाळेचे उदय पाटील (आबा), कराड दक्षिण काँग्रेसचे प्रवक्ते तानाजी चौरे यावेळी उपस्थित होते. 

COMMENTS