Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केजमध्ये जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सव उत्साहात संपन्न; मान्यवरांची मांदियाळी

केज । प्रतिनिधीबालमनाचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने जीवन शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद

आ. सुरेश धस यांना फेसबुक पोस्टद्वारे धमकी; कडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
हेल्मेट सक्ती करणारे प्रशासन निकृष्ट रस्ताकाम करणार्‍या कंत्राटदारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप
संयुक्त किसान कामगार मोर्चाच्या वतीने चक्काजाम आंदोलन

केज । प्रतिनिधी
बालमनाचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने जीवन शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, केज येथे सन 2025-26 चा जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. महिला व बालविकास विभाग तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
महोत्सवाचे उद्घाटन अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा डॉ. सौ. सीताताई बनसोड या होत्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे ज्येष्ठ नेते व गटनेते हारूणभाई इनामदार तसेच शासकीय निरीक्षण गृहाचे अधीक्षक मंसूरी अन्सार निसार यांची प्रमुख उपस्थिती होती. हा जिल्हास्तरीय महोत्सव यशस्वी करण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मनोज ससे, जिल्हा परिविक्षक अधिकारी मंगेश जाधव, तालुका महिला व बालविकास अधिकारी संतोष डोंगरदिवे तसेच बालकल्याण समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास राजूभाई इनामदार (गटनेते), जलालभाई इनामदार (नगरसेवक), मोहम्मद यासीन हारून इनामदार (सचिव, झुंजार सेवाभावी संस्था), प्राचार्य दत्तात्रय हंडीबाग, मुख्याध्यापक रमाकांत ढाकणे, विनायक ठोंबरे व अशोक शिंदे यांची उपस्थिती लाभली. या महोत्सवात विद्यार्थ्यांसह विविध सामाजिक व शासकीय यंत्रणांनी सक्रिय सहभाग नोंदविला. यामध्ये वन स्टॉप सेंटर व सखी सेंटर, बीड, जिल्हा चाइल्ड हेल्पलाईन 1098 चे अधिकारी व कर्मचारी, तालुका संरक्षण अधिकारी तसेच विविध सामाजिक संस्थांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांच्या वतीने सर्व मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या महोत्सवासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व जिल्ह्यातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बालकांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणार्‍या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

COMMENTS