Homeताज्या बातम्यादेश

इंदूरमधील दूषित पाण्याच्या दुर्घटनेतील बाधित कुटुंबांची खा. राहुल गांधींनी घेतली भेट

भोपाळ : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्याचा दौरा करत दूषित पाणी पिल्यामुळे आजारी पडलेल्या तसेच मृ

Rahul Gandhi : मारा, गाडा काहीही करा, पण शेतकऱ्यांचा मुद्दा लावून धरणारच (Video)
राहुल गांधींची जीभ छाटू नका, तर तिला चटके द्या !
काँग्रेसच्या वतीने कल्याणमध्ये भाजपाच्या विरोधात बॅनरबाजी

भोपाळ : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्याचा दौरा करत दूषित पाणी पिल्यामुळे आजारी पडलेल्या तसेच मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या दौर्‍यात त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत सरकारच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्‍न उपस्थित केले.
राहुल गांधी यांनी सर्वप्रथम बॉम्बे हॉस्पिटलला भेट देऊन उपचार घेत असलेल्या रुग्णांशी आणि त्यांच्या नातेवाइकांशी संवाद साधला. रुग्णांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतल्यानंतर त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी, स्मार्ट सिटी म्हणून गौरवण्यात येणार्‍या शहरात नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणीही मिळू नये, ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे नमूद केले. केवळ पाणी पिल्यामुळे संपूर्ण कुटुंबे आजारी पडत असतील, तर शहरी विकासाच्या दाव्यांवर प्रश्‍नचिन्ह उभे राहते, असे त्यांनी स्पष्ट केले. राहुल गांधी म्हणाले की, हे तथाकथित शहरी विकास मॉडेल अपयशी ठरत असून सरकार मूलभूत जबाबदार्‍यांकडे दुर्लक्ष करत आहे. अनेक कुटुंबांनी आपले आप्त गमावले असून मोठ्या संख्येने नागरिक उपचार घेत आहेत. ही समस्या फक्त इंदूरपुरती मर्यादित नसून देशातील अनेक शहरांमध्ये अशा घटना घडत असल्याचे त्यांनी सांगितले. बाधित आणि मृतांच्या कुटुंबांना तातडीने योग्य भरपाई देण्याची मागणीही त्यांनी केली. इंदूर दौर्‍यादरम्यान राहुल गांधी यांनी भागीरथपुरा परिसरात जाऊन दूषित पाण्यामुळे मृत्यू झालेल्या गीताबाई आणि जीवनलाल यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या वेळी त्यांनी दोन्ही कुटुंबांना प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली. त्यानंतर त्यांनी संस्कार गार्डन परिसरात जाऊन इतर बाधित कुटुंबांशी संवाद साधला. येथेही त्यांनी प्रत्येकी दीड लाख रुपयांचे धनादेश देत सर्वतोपरी मदतीचे आश्‍वासन दिले. या संपूर्ण दौर्‍यात राहुल गांधींसोबत काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, प्रदेश प्रभारी हरीश चौधरी, प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी, विरोधी पक्षनेते उमंग सिंघर आणि अजय सिंह यांनीही बाधित कुटुंबांची भेट घेतली.

रूग्णांशी भेट घेऊन केली चर्चा
बॉम्बे हॉस्पिटलमध्ये राहुल गांधी यांनी पाचव्या मजल्यावर उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांशी काही काळ चर्चा केली. तसेच दुसर्‍या मजल्यावर व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांकडून आजाराचे कारण आणि उपचारांची माहिती घेतली. दूषित पाणी पिल्यामुळेच प्रकृती बिघडल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. मात्र उपचारांबाबत प्रशासन आणि रुग्णालयाकडून योग्य सहकार्य मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

COMMENTS