Homeताज्या बातम्या

मुंंबईत ठाकरे बंधूंचे पानीपत !

आजच्या आधुनिक युगात लोकशाही देशामध्ये निवडणूका या पारंपारिक पद्धतीने न लढता त्या वेगळ्या पद्धतीने लढाव्या लागतील, ते तंत्र अवगत करून त्यांना मात द

शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही
‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेत सुरु होणार नवा अध्याय | Filmi Masala | LokNews24
शिवसेना आमदाराचे अँट्रासिटी संदर्भात बेताल वक्तव्य LokNews24 |

आजच्या आधुनिक युगात लोकशाही देशामध्ये निवडणूका या पारंपारिक पद्धतीने न लढता त्या वेगळ्या पद्धतीने लढाव्या लागतील, ते तंत्र अवगत करून त्यांना मात देण्यासाठी सज्ज होण्याची गरज असतांना, विरोधक मात्र पारंपारिक आयुधे वापरून निवडणूक लढवतांना दिसून येत आहे. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या निवडणुकीत दिसून येत आहे. निवडणुका कशा पद्धतीनेने लढवाव्यात आणि कशा जिंकाव्यात याचा वस्तूपाठच महाराष्ट्रात भाजपने घालून दिला आहे. खरंतर नगरपालिकेमध्ये सर्वाधिक जागा आणि नगराध्यक्ष पद मिळवल्यानंतर आता महानगरपालिकेमध्ये अपवादात्मक पालिका सोडल्या तर भाजपने पुन्हा एकदा सत्ता मिळवत राज्यात आपणच धुरंधर असल्याचे सिद्ध केले आहे.
मुंबई महानगरपालिकेमध्ये तब्बल 27 वर्षांनंतर भाजपची सत्ता  आली असून, शिंदेंच्या मदतीने भाजपचा महापौर होणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. भाजपने केवळ मुंबईच जिंकली नाही तर, पुणे, पिंपरी चिंचवड, अहिल्यानगरसह अनेक महानगरपालिका आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. त्याच कारणांची कारणमिमांसा करण्याची खरी गरज आहे. वास्तविक पाहता या सर्व निकालामध्ये मुंबई महानगरपालिका निवडणूक चुरशीची झाली होती. मात्र डिसेंबरमध्ये आम्ही लिहिलेल्या अग्रलेखातच काँगे्रसची भाजपला मुंबईत अप्रत्यक्ष मदत या लेखात काँगे्रस आणि वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र लढत महायुतीचा विजय सुकर केला असे आम्ही म्हटले होते. तो अग्रलेख आज खरा ठरतांना दिसून येत आहे. वास्तविक पाहता मुुंबईमध्ये उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना सोबत घेतले. तब्बल 20 वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे मुंबईत ठाकरे बंधूंचा ब्रॅन्ड चालेल अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली असून, भाजपने पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. शिंदे यांच्या शिवसेनेला दखल घेण्यासारखे यश मिळाले नसले तरी, त्यांची गरज भाजपला लागणार आहेच. या संपूर्ण राजकारणाचा परीघ समजून घेण्याची खरी गरज आहे.
काँगे्रसची निवडून येण्यासारखी स्थिती आजमितीस राहिलेली नाही. तरी काँगे्रस स्वबळावर निवडणूक लढवण्याचा नारा देत सत्ताधार्‍यांना अप्रत्यक्ष मदत करतो, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. एकेकाळी वंचित बहूनज आघाडीला भाजपची बी टीम म्हणणारी काँगे्रस आज त्याच भूमिकेत महाराष्ट्रात दिसून येत आहे. खरंतर काँगे्रसने निवडणूक लढवण्याचे तंत्र आता बदलण्याची खरी गरज आहे. भाजपने 2014 मध्येच निवडणूक लढवण्याचे नवे तंत्र अवलंबले. संघटनात्मक बदल केले. पक्ष ग्रामीण भागापर्यंत पोहोचला, तेथील कार्यकर्त्यांना ताकद दिली. त्याचप्रमाणे भाजपने नवख्या उमेदवारांना, साधारण घरातून आलेल्या तरूणांना संधी दिली. याउलट काँगे्रस नव्या उमेदवारांना संधीच देत नसल्याचे दिसून येत आहे. कर्नाटकामध्ये मुख्यमंत्रीपदाचा पेच सुरू आहे, मात्र शिवकुमार यांना मुख्यमंत्री पद सोडायला हायकमांड सुरू नाही. राजस्थानमध्ये पायलट आणि गेहलोत संघर्षात तेथील सत्ता काँगे्रसने गमावली. त्यामुळे एकीकडे भाजप केवळ निवडणुका या जिंकण्यासाठीच लढतो, तर दुसरीकडे काँगे्रसमध्ये ती जिंकण्याची इच्छाच दिसून येत नाही. त्यामुळे काँगे्रस सातत्याने पराभूत होतांना दिसून येत आहे. विविध राज्यातील मोठ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रीय नेते प्रचारात उतरल्याचे काही राज्यांतील महानगरपालिका निवडणुकीवरून दिसून आले. मात्र महाराष्ट्रात ना पंतप्रधान मोदींनी सभा घेतली, ना गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली. जशी सत्ताधारी पक्षांतील नेत्यांनी घेतली नाही, तशीच विरोधक असलेल्या कॉग्रेसच्या नेत्यांनी देखील घेतली नाही. मुळातच ठाकरे बंधूंनी मतदारांना ग्रहित धरणे हीच मोठी चूक आहे. ठाकरे बंधूंनी मुंबई आणि ठाण्यातील सभा वगळता इतरत्र जावून प्रचार केला नाही. किंबहूना दोन्ही ठाकरे बंधूंनी किमान 10 तरी कोपरा सभा घेण्याची गरज होती. मात्र त्यांनी ते केले नाही. केवळ भावनिक राजकारण करत महापालिका ताब्यात ठेवू हा त्यांचा कयास मात्र चुकीचा ठरला. यासोबतच निवडणुकीतील गोंधळ याकडे देखील दुर्लक्ष करता येणार नाही. शाई अवघ्या काही मिनिटांमध्ये नेलपॉलिश रिमुव्हरने निघणे, बोगस मतदार, मतदार यादीत नाव नसणे, यासारखे सर्रास प्रकार यानिमित्ताने समोर आले. काँगे्रसने काही जागा कमावल्या असल्या तरी, मुंबईत भाजपच्या सत्तेला त्यांनी मुंबईत हातभारच लावल्याचे दिसून येत आहे. तर राज ठाकरेंची जादू यावेळेस देखील चालली नसल्याचे या निकालावरून दिसून आले. खरंतर लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंना विधानसभा निवडणुकीत ज्याप्रकारे यश मिळाले नाही, तोच कित्ता या निवडणुकीत देखील दिसून आला. त्यामुळे मुंबईसह राज्यात अजित पवारांचे, दोन्ही ठाकरे बंधूंचे आणि खा. शरद पवारांच्या पक्षाचे देखील पानीपत झाल्याचे दिसून आले. तर काँगे्रसने चंद्रपूर आणि लातूर यासारख्या जिल्ह्यात सत्ता मिळवण्यात काही अशीं यश मिळाल्याचे चित्र आहे. त्यामुळे विरोधक असणार्‍या काँगे्रसने आता रणनीती बदलण्याची खरी गरज आहे.

COMMENTS