कोपरगाव शहर : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद अहिल्यानगर अंतर्गत कोपरगाव तालुक्यात प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, पोषण आहार, गृहभेटी, वजन श्रेणी, माता-बालकांना आहार वाटप आदी विकासात्मक योजना अत्यंत उत्कृष्टपणे राबवून त्यांची नोंद सर्वप्रथम ऑनलाइन केल्याबद्दल सुरेगाव गटाने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सुरेगाव गटाच्या पर्यवेक्षिका मीना गावित यांचा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी व जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय कदम यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. ही बाब नक्कीच अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांनी सुरेगाव गटातील सेविकांच्या सत्कारप्रसंगी व्यक्त केले. गोदाकाठ महोत्सवात तालुक्यातील वेगवेगळ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. मीना गावित यांनी आपल्या गटातील अंगणवाडी सेविका अश्विनी विनायक वाघ यांच्या विशेष मदतीने केलेल्या कामाची दखल घेत सन्मान घेण्यात आला. गटातील अंगणवाडी सेविका संगीता आदमाने, शोभा कोळपे, रत्नमाला जाधव, सीमा गायकवाड, संध्या काळे, प्रतिभा वाबळे, विजया कदम, छाया खंडवे, संगीता क्षीरसागर, मनीषा मेहेत्रे, प्रतिभा ठोके,वनिता पवार, नंदा मेहेरखांब, शुभांगी कानडे, कविता निकम, आशा गिरमे, सुरेखा पगारे, मंगल मोकळ, माया मोकळ, उषा काळे, अलका सोनवणे, अश्विनी देशमुख, कौसर सय्यद,भारती नवले,सुवर्णा जेऊघाले, भारती सोनटक्के, आशा जाधव यांच्या विशेष सहकार्याने उर्वरित सर्व ऑनलाईन कामे पूर्ण करून घेत तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला.

कोपरगाव शहर : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद अहिल्यानगर अंतर्गत कोपरगाव तालुक्यात प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, पोषण आहार, गृहभेटी, वजन श्रेणी, माता-बालकांना आहार वाटप आदी विकासात्मक योजना अत्यंत उत्कृष्टपणे राबवून त्यांची नोंद सर्वप्रथम ऑनलाइन केल्याबद्दल सुरेगाव गटाने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सुरेगाव गटाच्या पर्यवेक्षिका मीना गावित यांचा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी व जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय कदम यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. ही बाब नक्कीच अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांनी सुरेगाव गटातील सेविकांच्या सत्कारप्रसंगी व्यक्त केले.
गोदाकाठ महोत्सवात तालुक्यातील वेगवेगळ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. मीना गावित यांनी आपल्या गटातील अंगणवाडी सेविका अश्विनी विनायक वाघ यांच्या विशेष मदतीने केलेल्या कामाची दखल घेत सन्मान घेण्यात आला.
गटातील अंगणवाडी सेविका संगीता आदमाने, शोभा कोळपे, रत्नमाला जाधव, सीमा गायकवाड, संध्या काळे, प्रतिभा वाबळे, विजया कदम, छाया खंडवे, संगीता क्षीरसागर, मनीषा मेहेत्रे, प्रतिभा ठोके,वनिता पवार, नंदा मेहेरखांब, शुभांगी कानडे, कविता निकम, आशा गिरमे, सुरेखा पगारे, मंगल मोकळ, माया मोकळ, उषा काळे, अलका सोनवणे, अश्विनी देशमुख, कौसर सय्यद,भारती नवले,सुवर्णा जेऊघाले, भारती सोनटक्के, आशा जाधव यांच्या विशेष सहकार्याने उर्वरित सर्व ऑनलाईन कामे पूर्ण करून घेत तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला.

COMMENTS