शेतकरी पुत्र व जिल्हा प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्नसोयाबीन व कापूस खरेदीदरम्यान प्रतवारीच्या नावाखाली लूट केल्यास तात्काळ कारवाईकिमान आधारभू

शेतकरी पुत्र व जिल्हा प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
सोयाबीन व कापूस खरेदीदरम्यान प्रतवारीच्या नावाखाली लूट केल्यास तात्काळ कारवाई
किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी दरात शेतमाल खरेदी केल्यास संबंधितांचा परवाना रद्द होणार
बीड । प्रतिनिधी
शेतकरी हक्क मोर्चाच्या मागणीनुसार बीड जिल्हाधिकारी कार्यालयात कापूस, सोयाबीन व तूर खरेदीसह शेतकर्यांना भेडसावणार्या विविध अडचणींबाबत महत्त्वपूर्ण प्रशासकीय बैठक पार पडली. ही बैठक अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा उपनिबंधक, जिल्हा पणन अधिकारी तसेच संबंधित विभागांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने कापूस खरेदी केंद्र (उउख), सोयाबीन खरेदी केंद्र, कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा साठा अधीक्षक अधिकारी तसेच सर्व खरेदी केंद्र चालकांची संयुक्त बैठक घेण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार सदर बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीदरम्यान शेतकरी पुत्रांनी अनेक ठिकाणी सोयाबीनची खरेदी हमीभावापेक्षा कमी दराने होत असल्याचे पुरावे प्रशासनासमोर सादर केले. तसेच उउख खरेदी केंद्रांवर प्रतवारीच्या नावाखाली शेतकर्यांची अडवणूक व अन्याय होत असल्याच्या तक्रारी मांडण्यात आल्या. यावेळी शेतकर्यांची तात्काळ तूर खरेदी सुरू करण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली. यावर अप्पर जिल्हाधिकार्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील तसेच उद्यापासून तुरीच्या नोंदी घेतल्या जातील, असे स्पष्ट केले. बैठकीत बीड जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतमालाची प्रतवारी ठरवण्यासाठी एकही ग्रेडर पद भरलेले नसल्याची गंभीर बाब समोर आली. आजवर व्यापार्यांकडूनच प्रतवारी ठरवली जात असल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर ग्रेडर पदे तात्काळ भरण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन अप्पर जिल्हाधिकार्यांनी दिले. तसेच बीड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराबाहेर बेकायदेशीरपणे घेतली जाणारी मार्केट फी तात्काळ थांबवण्याचे आदेश देण्यात आले. या बैठकीत बीड जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी पुत्र व शेतकरी मित्रांची उल्लेखनीय एकजूट पाहायला मिळाली. या बैठकीस अप्पर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा उपनिबंधक सतीश तोटावर, जिल्हा पणन अधिकारी श्री. भोसले, कापूस प्राधिकरण (उउख) केंद्रप्रमुख, सोयाबीन खरेदी केंद्रांचे प्रमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे जिल्ह्यातील सर्व सचिव तसेच संबंधित विभागांचे कर्मचारी उपस्थित होते. शेतकरी पुत्र राजेंद्र आमटे, माजी सैनिक अशोकराव येडे, कुलदीप करपे, डॉ. गणेश ढवळे, गणेश नाईकवाडे, बाळासाहेब मोरे, शेतकरी मार्गदर्शक कालिदास आपेट, शेतकरी नेते अजय बुरांडे, सामाजिक कार्यकर्त्या सुशिलाताई मोराळे, जे. डी. तांदळे सर, अर्जुन सोनवणे, सुहास जायभाय, ज्ञानेश्वर राऊत, संगमेश्वर आंधळकर, रामेश्वर गाडे, राजू गायके, अभिषेक शिंदे, राजवीर महेश डोंगरे, अमोल पाठक, राधाकिसन पटेकर, मधुकर गाडी, शेख युनूस, सुदाम तांदळे आदी उपस्थित होते.

COMMENTS