सादिकच्या मृत्यूचे गूढ वाढले…वरिष्ठांना पाठवला अहवाल ; मुकुंदनगर परिसरात बंदोबस्त वाढवला, चौकशी अहवालाची प्रतीक्षा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सादिकच्या मृत्यूचे गूढ वाढले…वरिष्ठांना पाठवला अहवाल ; मुकुंदनगर परिसरात बंदोबस्त वाढवला, चौकशी अहवालाची प्रतीक्षा

अहमदनगर/प्रतिनिधी-पोलिसांच्या ताब्यात असलेल्या सादिक बिराजदार या आरोपीच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे. मात्र, त्याचा मृत्यू तो पोलिसांच्या कस्टडीत असताना

ढवळपुरीत ‘रेकॉर्ड ब्रेक’ लसीकरण, एकाच दिवसात तब्बल अकराशे नागरिकांनी घेतली लस.
जुन्या व्हायरसचा बंदोबस्त करणार ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता राणेंना लगावला टोला
विज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा खरवंडी कासार ला फटका निम्मे गाव अधांरात

अहमदनगर/प्रतिनिधी-पोलिसांच्या ताब्यात असलेल्या सादिक बिराजदार या आरोपीच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे. मात्र, त्याचा मृत्यू तो पोलिसांच्या कस्टडीत असताना झाला असल्याने जिल्हा पोलिस प्रशासनाने वरिष्ठांना अहवाल पाठवला आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी त्यास दुजोरा दिला असून भिंगार कॅम्पच्या त्या घटनेसंदर्भातला अहवाल वरिष्ठांकडे पाठवला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मुकुंदनगर परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या पोस्कोच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या सादिकने पोलिसांच्या गाडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्यात तो रस्त्यावर पडून जखमी झाला, अशा आशयाची फिर्याद कॅम्प पोलिसात देण्यात आली आहे तर याच प्रकरणाशी संबंधित दुसरी फिर्यादही दाखल असून, त्यानुसार सादिकला त्याच्याविरुद्ध दाखल पोस्को गुन्ह्यातील फिर्यादींनी पोलिसांची गाडी अडवून व खाली ओढून बेदम मारहाण केल्याने तो जखमी झाल्याची फिर्याद त्याच्या पत्नीने दिली आहे. एकाच घटनेच्या दोन वेगवेगळ्या फिर्यादी व दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्‍वभूमीवर जखमी सादिकचे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी रात्री निधन झाल्याने आता त्याच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे. तो नेमका गाडीतून खाली पडून जख़मी होऊन मरण पावला की, त्याला झालेल्या मारहाणीत तो मरण पावला, याचा संभ्रम अजूनही कायम आहे. या प्रकरणासंदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षक पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. असा प्रकार होता कामा नये. या सर्व प्रकाराची चौकशी सध्या सुरू आहे. लवकरच त्याचा अहवाल प्राप्त होईल. मात्र सादिक हा पोलीस कस्टडीत असतानाच मृत झाला आहे, हे निश्‍चित आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या प्रकरणात संदर्भामध्ये चौकशी अहवाल आल्यानंतरच या प्रकरणांमध्ये जे कुणी दोषी असतील, त्यांच्यावर निश्‍चितपणे कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या कुटुंबाने पोलीस संरक्षणाची मागणी केलेली असली तर निश्‍चितपणे त्याचाही विचार केला जाईल, असे अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

वविच्छेदन अहवाल प्रतीक्षेत
सादिक याचा मृतदेह शनिवारी शवविच्छेदनासाठी पुणे येथे पाठविण्यात आला आहे. त्याचा अहवाल प्राथमिक स्तरावरचा आल्यानंतर व त्या अहवालात मृत्यूचे नेमके कारण समजल्यानंतर पुढील फिर्यादीमध्ये कशा पद्धतीने कलम वाढवता येतील, ते ठरवले जाईल, पण जोपर्यंत अहवाल येत नाही, तोपर्यंत निर्णय घेता येत नाही, असे पोलिस अधीक्षक पाटील म्हणाले.

COMMENTS