Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिर्डी नगरपरिषदेत  शेळके उपनगराध्यक्ष

शिर्डी : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिर्डी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारण्याचा सोहळा संपन्न झाला.  या सोहळ्यात जयश्री थोरात यांनी शिर्डी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचा पदभार अधिकृतरीत्या स्वीकारला, तर अभय शेळके यांची उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली.  यावेळी बोलताना नामदार विखे पाटील यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, “शिर्डीच्या विकासासाठी  पारदर्शकता आणि लोकाभिमुख कारभार अत्यंत आवश्यक आहे. जयश्री  आणि अभय शेळके हे या शिर्डीतील नागरिकांच्या विश्वासाला नक्कीच पात्र ठरतील आणि शहराच्या विकासाला नवी गती देतील.  पदभार स्वीकारल्यानंतर नगराध्यक्षा जयश्री थोरात आणि उपनगराध्यक्ष अभय शेळके यांनी नगरसेवक, कार्यकर्ते आणि वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानले. शिर्डी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कोणताही भेदभाव न करता काम करू आणि नागरिकांच्या प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य देऊ, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.  या निवडीमुळे शिर्डीत महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. कार्यक्रमाला नगरसेवक, पदाधिकारी, विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि शिर्डी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. पुंडलिक राहात्याचे उपनगराध्यक्ष 
बेबी बर्डे देवळाली प्रवराचे उपनगराध्यक्ष 
“या” नगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजला

शिर्डी : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिर्डी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारण्याचा सोहळा संपन्न झाला.

 या सोहळ्यात जयश्री थोरात यांनी शिर्डी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचा पदभार अधिकृतरीत्या स्वीकारला, तर अभय शेळके यांची उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली.

 यावेळी बोलताना नामदार विखे पाटील यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, “शिर्डीच्या विकासासाठी  पारदर्शकता आणि लोकाभिमुख कारभार अत्यंत आवश्यक आहे. जयश्री  आणि अभय शेळके हे या शिर्डीतील नागरिकांच्या विश्वासाला नक्कीच पात्र ठरतील आणि शहराच्या विकासाला नवी गती देतील.

 पदभार स्वीकारल्यानंतर नगराध्यक्षा जयश्री थोरात आणि उपनगराध्यक्ष अभय शेळके यांनी नगरसेवक, कार्यकर्ते आणि वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानले. शिर्डी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कोणताही भेदभाव न करता काम करू आणि नागरिकांच्या प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य देऊ, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

 या निवडीमुळे शिर्डीत महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. कार्यक्रमाला नगरसेवक, पदाधिकारी, विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि शिर्डी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS