सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1 हजार 90 रुग्णांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.
सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1 हजार 90 रुग्णांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच विविध ठिकाणी उपचार घेत असलेल्या 11 बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सातारा जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 301 रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना आज घरी सोडण्यात आले.
उपचारादरम्यान 11 बाधित रुग्णांचा मृत्यू
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील वडूज, ता. खटाव येथील 16 वर्षीय महिला, रानमळा, ता. पाटण येथील 60 वर्षीय पुरुष, करंजे, ता. सा
तारा येथील 69 वर्षी पुरुष, सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, रविवार पेठ, ता. सातारा येथील 65 वर्षीय महिला, बोरगाव, ता. सातारा येथील 45 वर्षीय पुरुष, रेणावळे, ता. सातारा येथील 73 वर्षीय पुरुष, करंजे पेठ सातारा येथील 46 वर्षीय महिला व खासगी हॉस्पीटलमध्ये कळंबे, ता. खटाव येथील 65 वर्षीय पुरुष, मुजावर कॉलनी, ता. कराड येथील 43 वर्षीय महिला, सुपने, ता. कराड येथील 61 वर्षीय पुरुष अशा एकूण 11 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
COMMENTS