कर्जत : सामाजिक ऐक्य, माणुसकी आणि सद्भावना जपण्याचा संदेश देणारी नांदेड ते अहिल्यानगर सद्भावना सायकल यात्रा कर्जत येथे दाखल होताच ग्रामस्थ व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने तिचे जोरदार स्वागत करण्यात आले. स्नेहालय संस्थेच्या युवा निर्माण प्रकल्प आणि समविचारी सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेचे स्वागत सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने कोरेगाव रोडवरील मुंजोबा चौक येथे करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी यांच्या वतीने सायकल यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना स्नेहालय संस्थेचे प्रमुख गिरीश कुलकर्णी म्हणाले, “ही सायकल सद्भावना यात्रा माणुसकी जपण्यासाठी आणि समाजातील जात, धर्म, भाषा, लिंग, गाव-तालुक्यांमधील भेदाभेद कमी करण्यासाठी काढण्यात आली आहे. अनेक भाषा, जाती, वेगवेगळे पेहराव व चालीरीती असूनही आपण सर्वजण एकच आहोत, हाच संदेश या यात्रेच्या माध्यमातून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सध्या सामाजिक स्वास्थ्य बिघडत चालले असून ते पुन्हा सुदृढ व्हावे, यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आहे.” ही यात्रा प्रथम मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील एकूण दहा जिल्ह्यांतून काढण्यात आली असून, निवडणुकांमुळे पुढील टप्प्यात उर्वरित महाराष्ट्रात ही यात्रा नेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. “दरवर्षी अशा स्वरूपाची यात्रा काढून देश एकसंघ ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. भावनिकदृष्ट्या दुभंगलेल्या महाराष्ट्राला व देशाला पुन्हा एकत्र आणण्यासाठी हा उपक्रम आहे,” असेही कुलकर्णी यांनी नमूद केले. यावेळी रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचे अध्यक्ष प्राचार्य चंद्रकांत राऊत, नितीन तोरडमल, सचिन धांडे शिंदे, संदीप गदादे, दयानंद पाटील, सदाशिव फरांडे यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कर्जत : सामाजिक ऐक्य, माणुसकी आणि सद्भावना जपण्याचा संदेश देणारी नांदेड ते अहिल्यानगर सद्भावना सायकल यात्रा कर्जत येथे दाखल होताच ग्रामस्थ व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने तिचे जोरदार स्वागत करण्यात आले. स्नेहालय संस्थेच्या युवा निर्माण प्रकल्प आणि समविचारी सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे.
या यात्रेचे स्वागत सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने कोरेगाव रोडवरील मुंजोबा चौक येथे करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी यांच्या वतीने सायकल यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना स्नेहालय संस्थेचे प्रमुख गिरीश कुलकर्णी म्हणाले, “ही सायकल सद्भावना यात्रा माणुसकी जपण्यासाठी आणि समाजातील जात, धर्म, भाषा, लिंग, गाव-तालुक्यांमधील भेदाभेद कमी करण्यासाठी काढण्यात आली आहे. अनेक भाषा, जाती, वेगवेगळे पेहराव व चालीरीती असूनही आपण सर्वजण एकच आहोत, हाच संदेश या यात्रेच्या माध्यमातून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सध्या सामाजिक स्वास्थ्य बिघडत चालले असून ते पुन्हा सुदृढ व्हावे, यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आहे.”
ही यात्रा प्रथम मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील एकूण दहा जिल्ह्यांतून काढण्यात आली असून, निवडणुकांमुळे पुढील टप्प्यात उर्वरित महाराष्ट्रात ही यात्रा नेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. “दरवर्षी अशा स्वरूपाची यात्रा काढून देश एकसंघ ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. भावनिकदृष्ट्या दुभंगलेल्या महाराष्ट्राला व देशाला पुन्हा एकत्र आणण्यासाठी हा उपक्रम आहे,” असेही कुलकर्णी यांनी नमूद केले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचे अध्यक्ष प्राचार्य चंद्रकांत राऊत, नितीन तोरडमल, सचिन धांडे शिंदे, संदीप गदादे, दयानंद पाटील, सदाशिव फरांडे यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS