Homeताज्या बातम्यादेश

इंदूरमध्ये अपघातात माजी मंत्र्यांच्या मुलीसह तिघांचा मृत्यू

इंदूर : शहराजवळील रालामंडल परिसरात शुक्रवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. भरधाव का

दुचाकीची धडक बसल्याने वृद्ध महिलेचा झाला मृत्यू
दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात दाम्पत्यासह नदीत कोसळली कार.
वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर भीषण दुर्घटना भर रस्त्यात कारला लागली आग.

इंदूर : शहराजवळील रालामंडल परिसरात शुक्रवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. भरधाव कारने एका ट्रकला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. मृतांमध्ये माजी गृहमंत्री बाळा बच्चन यांची मुलगी प्रेरणा बच्चन तसेच काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद कासलीवाल यांचा मुलगा प्रखर कासलीवाल यांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे सुमारे सव्वापाचच्या सुमारास ग्रे रंगाची नेक्सन कार इंदूरकडे येत असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार थेट समोरून येणार्‍या ट्रकमध्ये घुसली. धडक इतकी तीव्र होती की कारचा पुढील भाग पूर्णतः चिरडला गेला. या कारमध्ये चार जण प्रवास करत होते. त्यापैकी प्रेरणा बच्चन, प्रखर कासलीवाल आणि मानसंधू यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अनुष्का राठी ही तरुणी गंभीर जखमी असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातस्थळी कारमधून मद्याच्या बाटल्या आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी एमवाय रुग्णालयात पाठवण्यात आले. माजी मंत्री बाळा बच्चन हेही रुग्णालयात उपस्थित होते. मृत सर्वजण इंदूर शहरातील वेगवेगळ्या भागातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, अपघातानंतर संबंधित ट्रकचा चालक वाहनासह पसार झाला असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अपघाताचे नेमके कारण आणि ट्रक चालकाची भूमिका याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे इंदूरमध्ये हळहळ व्यक्त होत असून, राजकीय व सामाजिक क्षेत्रातून शोकसंवेदना व्यक्त केल्या जात आहेत.

COMMENTS