Homeताज्या बातम्या

अहिल्यानगरचा पहिला महापौर महायुतीचा असेल :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्‍वास

अहिल्यानगर ः अहमदनगरचे आत्तापर्यंत अनेक महापौर झाले, मात्र अहिल्यानगरचा पहिला महापौर हा महायुतीचा असेल असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

पर्यावरण संवर्धन जनजागृती सायकल महारॅलीला उत्स्फुर्त प्रतिसाद : मनोहर शिंदे
माजलगाव बा.स.चे सभापती जयदत्त नरवडे तर उपसभापती श्रीहरी मोरे.
आई कुठे काय करते फेम अभिनेत्री गोंडस मुलाची आई झाली

अहिल्यानगर ः अहमदनगरचे आत्तापर्यंत अनेक महापौर झाले, मात्र अहिल्यानगरचा पहिला महापौर हा महायुतीचा असेल असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी अहिल्यानगरमध्ये व्यक्त केला. शहरातील मॉर्केट यार्ड येथे झालेल्या जाहीर सभेला संबोधित करतांना ते बोलत होते. यावेळी सभापती प्रा. राम शिंदे, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, मोनिकाताई राजळे, विक्रमसिंह पाचपुते, माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवींनी आपल्या राज्यकारभारातून कल्याणकारी राज्य स्थापित करत, हिंदू मंदिर बांधण्याचे काम केलेल्या अहिल्यादेवींच्या नावामुळे हा जिल्हा ओळखला जातो. गावांचा विकास करता-करता शहरांच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले. शहराची लोकसंख्या वाढल्यामुळे विविध प्रश्‍न निर्माण झाले. मात्र 2014 साली नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर आपण शहराच्या विकासाच्या प्रश्‍नांकडे प्राधान्य दिले. मूलभूत सोयी-सुविधांसाठी आपण कटिबद्ध असून त्यासाठी आपण विविध योजना सुरू केल्या असून त्या माध्यमातून शहराचा विकास घडवून आणत आहे. स्मार्ट सिटी योजना, अमृत योजना, यासह विविध योजनांच्या माध्यमातून कोट्यावधी रूपये शहराच्या विकासासाठी देत आहोत, त्यातूनप शहराचा चेहरा-मोहरा बदलत असल्याचा विश्‍वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
अहिल्यानगर शहराची पाणीपुरवठा योजना 492 कोटींची ती आता राज्य सरकारकडे आलेली आहे. महायुतीचा  महापौर झाल्यानंतर पहिल्याच महिन्यात या प्रस्तावाला मान्यता देऊ. यासोबतच अहिल्यानगर एमआयडीसीचा विस्तार आपण करणार आहोत, असे आश्‍वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

COMMENTS