Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तीस वर्षांनी रंगला मित्र-मैत्रिणींचा मेळावा

श्रीगोंदा: तालुक्यातील कोळगाव येथील श्री कोळाईदेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथील सन १९८९ ते सन १९९४ या कालावधीतील विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा ४ जानेवारी रोजी उत्साहात पार पाडला. या निमित्ताने तब्बल ३० वर्षांनी मित्र-मैत्रिणींची पुन्हा भेट झाली. जुन्या मित्रांना एकत्र आणण्याची धडपड शिवसेना श्रीगोंदा उप तालुकाप्रमुख आण्णासाहेब जगताप, अंबादास वाळके, शिला मिसाळ या मित्रांनी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकांत काटे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक शहाजी नलगे मेजर हे होते. रामदास जठार, शंकरराव कदम, नानासाहेब साबळे, पारखे, अशोकराव पंडित, पोपटराव खेतमाळीस, लोकरे हे सर्व सेवानिवृत्त शिक्षक यावेळी उपस्थित होते. मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर सेवानिवृत्त शिक्षकांचा गौरव करण्यात आला.   विद्यालयाचे मुख्याध्यापक शहाजी हिरडे आणि विद्यालयातील शिक्षक व माजी विद्यार्थी संघाचे प्रमुख प्रशांत खामकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  विद्यालयाचे माजी विद्यार्थी मेजर अंकुश लाटे, नंदा लगड, शिवाजी ढोरजकर, वैशाली नलगे, सिंधू रायकर, सुनिता साके, मंदाकिनी बारगुजे, मनोहर मेटे, अरुणा हराळ, संतोष नलगे, गोवर्धन दारकुंडे, सुनिता खामकर, नंदा काटे, सुरेखा लगड, बिजल धस, अशोक धस, मधुकर लगड, शिवाजी भोसले, चंद्रकांत वाणी, सोमनाथ लगड, विद्या नलगे, पूजा वाणी, कांचन उजगरे, वनिता मानकर, किरण लाटे, दत्ता पवार, सोनबा बांदल, दत्तात्रय मुंडफण, संतोष लगड, मुक्ताजी गायकवाड, संजय बारगुजे यांनी मनोगत व्यक्त केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आण्णासाहेब जगताप व शिला मिसाळ यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आभार लालासाहेब पानसरे यांनी मानले.

क्रांतिज्योती सावित्रीबाईंचे कार्य आजही प्रेरणादायी : पोटे
वेशभूषा स्पर्धेत काव्या ढवळे प्रथम
जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सेजल राऊत प्रथम 

श्रीगोंदा: तालुक्यातील कोळगाव येथील श्री कोळाईदेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथील सन १९८९ ते सन १९९४ या कालावधीतील विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा ४ जानेवारी रोजी उत्साहात पार पाडला. या निमित्ताने तब्बल ३० वर्षांनी मित्र-मैत्रिणींची पुन्हा भेट झाली. जुन्या मित्रांना एकत्र आणण्याची धडपड शिवसेना श्रीगोंदा उप तालुकाप्रमुख आण्णासाहेब जगताप, अंबादास वाळके, शिला मिसाळ या मित्रांनी केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकांत काटे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक शहाजी नलगे मेजर हे होते. रामदास जठार, शंकरराव कदम, नानासाहेब साबळे, पारखे, अशोकराव पंडित, पोपटराव खेतमाळीस, लोकरे हे सर्व सेवानिवृत्त शिक्षक यावेळी उपस्थित होते. मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर सेवानिवृत्त शिक्षकांचा गौरव करण्यात आला.

  विद्यालयाचे मुख्याध्यापक शहाजी हिरडे आणि विद्यालयातील शिक्षक व माजी विद्यार्थी संघाचे प्रमुख प्रशांत खामकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  विद्यालयाचे माजी विद्यार्थी मेजर अंकुश लाटे, नंदा लगड, शिवाजी ढोरजकर, वैशाली नलगे, सिंधू रायकर, सुनिता साके, मंदाकिनी बारगुजे, मनोहर मेटे, अरुणा हराळ, संतोष नलगे, गोवर्धन दारकुंडे, सुनिता खामकर, नंदा काटे, सुरेखा लगड, बिजल धस, अशोक धस, मधुकर लगड, शिवाजी भोसले, चंद्रकांत वाणी, सोमनाथ लगड, विद्या नलगे, पूजा वाणी, कांचन उजगरे, वनिता मानकर, किरण लाटे, दत्ता पवार, सोनबा बांदल, दत्तात्रय मुंडफण, संतोष लगड, मुक्ताजी गायकवाड, संजय बारगुजे यांनी मनोगत व्यक्त केले.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आण्णासाहेब जगताप व शिला मिसाळ यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आभार लालासाहेब पानसरे यांनी मानले.

COMMENTS