Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नागरी उपेक्षेचा कडेलोट : सोमेश कॉलनीत मतदान बहिष्काराचा इशारा

नांदेड । प्रतिनिधीनांदेड शहरातील मध्यवर्ती भाग म्हणून ओळख असलेल्या कला मंदिर परिसरातील सोमेश कॉलनी आज नागरी उपेक्षेचे जिवंत उदाहरण ठरत आहे. वर्षान

बॅलेट पेपर आणि तेलंगणा नगरपालिका निवडणूक !
निवडणूक डोळ्यासमोर ठेवून रस्त्यांची डागडुजी!
ठाकरे सेनेच्या प्रचार पदयात्रेने मतदारांमध्ये आत्मविश्वास

नांदेड । प्रतिनिधी
नांदेड शहरातील मध्यवर्ती भाग म्हणून ओळख असलेल्या कला मंदिर परिसरातील सोमेश कॉलनी आज नागरी उपेक्षेचे जिवंत उदाहरण ठरत आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मूलभूत सुविधांमुळे वैतागलेल्या रहिवाशांनी आता थेट महानगरपालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. 15 जानेवारी रोजी होणार्‍या मनपा निवडणुकीत मतदान न करण्याचा इशारा देत नागरिकांनी प्रशासनाविरोधात आपला संताप व्यक्त केला आहे.
या कॉलनीतील रहिवाशांनी अनेक वेळा महानगरपालिका प्रशासनाकडे निवेदने, तक्रारी व पाठपुरावा केला. मात्र, आश्वासनांपलीकडे काहीही न घडल्याने नागरिकांचा संयम सुटला आहे. मतदान हाच आमचा एकमेव आवाज आहे; तोच आवाज आता बहिष्कारातून ऐकू द्यावा लागेल, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. गेल्या तीन वर्षांपासून कला मंदिर ते विश्व हॉस्पिटलदरम्यानचे तसेच अंतर्गत रस्ते खोदून ठेवलेले आहेत. या अर्धवट कामांमुळे महिला, ज्येष्ठ नागरिक व वाहनधारकांना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. चुकीच्या पद्धतीने टाकलेल्या ड्रेनेज लाईनमुळे नालीतील सांडपाणी दिवस-रात्र रस्त्यावर वाहत असून परिसरात दुर्गंधी व आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. याशिवाय, पिण्याच्या पाण्याची टंचाई, स्ट्रीट लाईटचा अभाव, तसेच परिसरात प्रार्थनास्थळे व लहान-मोठे दवाखाने असूनही मूलभूत सोयींची वानवा ही गंभीर बाब ठरत आहे. विशेष म्हणजे, सर्वाधिक आणि वेळेवर कर भरणारे नागरिक याच भागात राहत असताना त्यांनाच मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याने नाराजीचा सूर अधिक तीव्र झाला आहे. शहराच्या मध्यवर्ती व वर्तुळीच्या महत्त्वाच्या भागात असूनही आमच्याकडे दुर्लक्ष होत आहे, अशी खंत रहिवाशांनी व्यक्त केली. आता या मतदान बहिष्काराच्या इशार्‍यानंतर मनपा प्रशासन कोणती ठोस भूमिका घेते, की नेहमीप्रमाणे दुर्लक्षच केले जाते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

COMMENTS