Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातार्‍यात साहित्य संमेलन कालावधीत एका बाजूची अतिक्रमणे पसार तर दुसरीकडील कुलूप बंद?

सातारा / प्रतिनिधी : छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा शहराला पेन्शनरचे गाव असे सांगितले जात होते. परंतु, सध्या वाढत्या अतिक्रमणामुळे साता

आ. जयंत पाटील यांनी आडवे पडायचे काम केले : आ. सदाभाऊ खोत
वाघजाईवाडीत भिंत खचून दोन जनावरांचा मृत्यु
कोयना धरणग्रस्तांच्या भूखंड गैरव्यवहार; शासनाच्या नोटीसीने खळबळ

सातारा / प्रतिनिधी : छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा शहराला पेन्शनरचे गाव असे सांगितले जात होते. परंतु, सध्या वाढत्या अतिक्रमणामुळे सातारची ओळख अतिक्रमणाच्या विळख्यातील शहर अशी बनवली गेली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामुळे सातार्‍यातील छत्रपती शाहू स्टेडियम परिसरातील अतिक्रमणे पसार झाली मात्र मध्यवर्ती बसस्थानकापासून ते तहसिलदार कार्यालय या मार्गावरील फुटपाथवरील मात्र कुलूप बंद पहावयास मिळाली. यामुळे कायदा व सुव्यवस्थेची अपेक्षा ठेवणार्‍या नागरिकांनी संमेलनाच्या आयोजकांचे मनापासून आभार मानले आहेत. संमेलन संपल्यानंतर पसार झालेल्या अतिक्रणाबरोबर हे कुलूपबंद जागेवर वैध-अवैध धंदे पुन्हा अर्थपुर्ण संबंध जपले जात असल्याने नियमितपणे सुरु राहण्याची शक्यता आहे. हे जिल्हा प्रशासन व सातारा नगरपालिकेचे खास आकर्षण ठरले आहे.
याबाबत माहिती अशी की, सातारा नगरपालिकेची निवडणूक पुढे ढकलली जात असल्याने प्रशासकीय कारभार सुरू होता. आता संपूर्ण नगरपालिका राज्य व केंद्रात भाजपचे सरकार आल्यामुळे सर्वसामान्य माणसांना अच्छे दिन नको पण अतिक्रमण मुक्त सातारा एवढीच माफक अपेक्षा होती. ती सध्या सुरु असलेल्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने फोल ठरल्याचे पहावयास मिळाले. सातारा नगरपालिकेत आता अतिक्रमणास समर्थन करणारे मसीहा निवडून आल्याने सामान्य जनतेला फुटपाथ शोधणे अवघड झाले आहे. सातारा बस स्थानक परिसरात तसेच नाक्याभोवती मोठ्या प्रमाणात अतिक्रमण बोकाळे आहे. तरी सातारा नगरपालिका अतिक्रमण विभागाच्या मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्याची वेळ कोणावर येणार असा सवाल उपस्थित होत आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून देशभरातील विचारवंद सातारा शहरात आले आहेत. अशा वेळेला सातारा नगरपालिकेची अब्रू चव्हाट्यावर जाऊ नये. यासाठी अतिक्रमणवाल्यांना विनंती करून त्यांची दुकानदारी बंद करण्यास लावण्यात आली आहे. या अतिक्रमणातून मोठे अर्थकारण होत असले तरी या अतिक्रमणाच्या माध्यमातून काही बेरोजगार व प्रामाणिक व्यवसाय करणारे ही व्यवसायिक आहेत. त्यांचे योग्य पुनर्वसन मानवतेच्या भावनेतून झालेच पाहिजे. मात्र, एका बाजूला प्रशासकीय व लोकप्रतिनिधी समर्थक हप्ते खोरी आणि दुसर्‍या बाजूला गुंडांना खंडणी देऊन उर्वरित उपजीविकेसाठी वापरावा लागत आहे. आता सातारा नगरपालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील अतिक्रमणे हटवावीत. ऊेळप्रसंगी यासाठी सभागृहात आवाज उठवला तर काहींना निवडणुकीत प्रचार करण्यासाठी रोजाने कोणास बोलवण्याची गरज पडणार नाही.

COMMENTS