Homeमहाराष्ट्रबीड

लातूर-कल्याण द्रुतगती महामार्ग लातूर-आंबेजोगाई-केज-बीड मार्गेच व्हावा

केज नगरपंचायतीचा एकमताने ठराव; इनामदार-बनसोड यांची माहितीकेज । प्रतिनिधीप्रस्तावित लातूर-कल्याण द्रुतगती महामार्ग हा लातूर, आंबेजोगाई, केज, बीड, ज

Solapur : या महामार्गाचे काम अतिशय निकृष्ठ दर्जाचे (Video)
Sangamner : संगमनेर शहरातील चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरु होणार (Video)
जामखेड शहरात 548-डी महामार्गाचा बोजवारा; चौकशीची मागणी

केज नगरपंचायतीचा एकमताने ठराव; इनामदार-बनसोड यांची माहिती
केज । प्रतिनिधी
प्रस्तावित लातूर-कल्याण द्रुतगती महामार्ग हा लातूर, आंबेजोगाई, केज, बीड, जामखेड, अहिल्यानगर मार्गेच राबविण्यात यावा, अशी ठाम मागणी केज नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आली. यासंदर्भातील ठराव सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांच्या एकमताने मंजूर करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे ज्येष्ठ नेते हारुणभाई इनामदार यांनी हा ठराव मांडला. नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण-लातूर द्रुतगती महामार्गास मंजुरी दिल्याची घोषणा केली होती. मूळ प्रस्तावानुसार हा महामार्ग बीड जिल्ह्यातून जाणे अपेक्षित असून, त्यामुळे जिल्ह्याच्या आर्थिक व औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे, असे इनामदार यांनी नमूद केले. हा महामार्ग केज शहरातून गेल्यास औद्योगिक प्रगती, शेतीमालाची वाहतूक, दळणवळण सुलभता तसेच रोजगारनिर्मिती यांना मोठा फायदा होणार आहे. बीड जिल्ह्यातून मुंबई व पुणे येथे मालवाहतूक करणे अधिक सोपे होईल आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला बळ मिळेल. दरम्यान, हा महामार्ग धाराशिव जिल्ह्याकडे वळविण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येत असून, तसे झाल्यास केज शहरासह संपूर्ण बीड जिल्ह्याचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प बीड जिल्ह्यातूनच राबविणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत सभेत व्यक्त करण्यात आले. या ठरावास गटनेते रामचंद्र गुंड यांनी अनुमोदन दिले. यावर सविस्तर चर्चा होऊन सर्वपक्षीय नगरसेवकांनी सहमती दर्शवली आणि ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केज नगरपंचायतीच्या वतीने अधिकृत निवेदन सादर करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड व ज्येष्ठ नेते हारुणभाई इनामदार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

COMMENTS