Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चीनमधून आणलेल्या बेदाण्याचा सांगली येथे साठा

सांगली / प्रतिनिधी : जिल्ह्यातील सांगली शहर आणि तासगांव मधील काही कोल्ड स्टोरेज मालकांनी चीनचा बेदाणा अफगाणिस्तानमार्गे सांगली जिल्ह्यात आयात केला आह

शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू; रांगणा किल्यावरील घटना; मृत तरुण पणूंब्रे-वारुण येथील
कराडचा सिध्दांत सिंहासने अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेत देशात 17 वा
‘आरटीई’ची सोमवारी निवड व प्रतीक्षा यादी

सांगली / प्रतिनिधी : जिल्ह्यातील सांगली शहर आणि तासगांव मधील काही कोल्ड स्टोरेज मालकांनी चीनचा बेदाणा अफगाणिस्तानमार्गे सांगली जिल्ह्यात आयात केला आहे. बागायतदार संघाच्या पदाधिकार्‍यांनी त्याचा भांडा फोड केला आहे. त्यामुळे देशाअंतर्गत बेदाण्याचे दर पाडण्याचे षडयंत्र सुरु आहे. बेदाणा आयात करणार्‍या व्यापार्‍यांना बदडून काढू, असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला. अफगाणिस्तानातून तस्करी केलेला बेदाणा थेट तासगाव आणि सांगलीच्या कोल्ड स्टोरेजवर असल्याची माहिती मिळाल्यानंतर द्राक्ष बागायतदार संघाच्या पदाधिकार्‍यांनी कोल्ड स्टोरेज आणि वॉशिंग सेंटरवर धाडी टाकल्या. अनेक ठिकाणी अफगाणिस्तानचा बेदाणा आढळून आला. मात्र, वॉशिंग सेंटर आणि कोल्ड स्टोरेज चालकांनी बेदाण्याबाबत अधिक माहिती देण्यास टाळाटाळ केली. देशातील बेदाणा उत्पादक शेतकर्‍यांना सद्या 300 ते 350 रुपये प्रति किलो भाव मिळतो आहे. तर चीनचा बेदाणा 150 ते 200 रुपये प्रति किलोने मिळतो आहे. तो बेदाणा आयात करून इथले दर पाडले जात आहेत. याबाबतीत द्राक्ष बागायतदार संघाच्या पदाधिकार्‍यांनी बटेजा आणि राधेय कोल्ड स्टोरेजवर धाड टाकून परदेशीं बेदाणा आयात केल्याचे सिध्द केले आहे.

COMMENTS