Homeमहाराष्ट्र

खोपोली हत्याकांडप्रकरणात दोघांना अटक

xr:d:DAF1XU2IAWM:54,j:8318560495602170102,t:23121118 आरोपी देवकर पिता-पुत्राला घेतले ताब्यातरायगड : जिल्ह्यातील खोपोली येथील माजी नगरसेवक मंगेश काळ

अभिनेते अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर
पुण्यात प्रसंगावधान राखत चिमुरडीला वाचवले
सीबीआयने घेतली सिसोदिया यांच्या बँक लॉकरची झाडाझडती
xr:d:DAF1XU2IAWM:54,j:8318560495602170102,t:23121118

आरोपी देवकर पिता-पुत्राला घेतले ताब्यात
रायगड : जिल्ह्यातील खोपोली येथील माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांची शुक्रवारी हत्या करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांनी अवघ्या 26 तासांमध्ये आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. शनिवारी पोलिसांना या हत्येचा छडा लावण्यात यश आले असून, त्यांनी मुख्य 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. रवींद्र देवकर आणि त्यांचा त्यांचा मुलगा दर्शन रवींद्र देवकर याला रायगड पोलिसांनी शनिवारी अटक करत ताब्यात घेतले आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार, मंगेश काळोखे यांची पत्नी मानसी काळोखो यांनी याच देवकर परिवाराविरोधात नगरपालिकेची निवडणूक लढवली होती. त्यांनी देवकर परिवारातील महिला उमेदवाराचा पराभव करीत त्या शिवसेना पक्षातून नगरसेविका झाल्या होत्या. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांच्या पतीची हत्या करण्यात आली.  खोपोलीमधील मंगेश काळोखे हत्येप्रकरणी 24 तास उलटून सुद्धा आरोपींना अटक होत नसल्याने स्थानिक आमदार महेंद्र थोरवे आणि समर्थकांकडून खोपोली मधील परिसरात ठिय्या आंदोलन करण्यात आले. मंगेश काळोखे यांची काल सकाळी 7 वाजता हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर खोपोलीमध्ये कालपासून तणावाचे वातावरण आहे. काल दिवसभर काळोखे यांच्या समर्थकांनी खोपोली पोलीस स्टेशनला घेराव घालून आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती. त्यानंतर शनिवारी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. खोपोली नगरपालिकेच्या शिंदे सेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीची शुक्रवारी सकाळी 7 वाजता हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. यावेळी घटनास्थळाजवळ असलेल्या काही नागरिकांनी हल्लेखोरांना पाहिले असता ते हल्लेखोर काळ्या रंगाच्या वाहनातून आल्याची माहिती समोर आली होती, त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरूवात केली होती.

हत्येमागे राजकीय पार्श्‍वभूमी
माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांच्या हत्येनंतर तपासासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली 8 वेगवेगळ्या टीम तपासाठी कार्यरत होत्या. या तपासात खोपोली, नवी मुंबई, मुंबई एअरपोर्ट, रायगडसह अन्य परिसरात 8 टीम काल पासून कार्यरत असून आरोपींचा शोध घेत होते. अशातच, रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथे शनिवारी सकाळी रवींद्र देवकर, दर्शन देवकर यांच्या गाडीला पोलिसांनी पकडत देवकर पिता-पुत्राला ताब्यात घेतले. देवकर यांनी नगरपालिका निवडणूक लढवली होती, यात त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे या हत्येमागे राजकीय पार्श्‍वभूमी असल्याचे दिसून येत असून पोलिस त्या दिशेने तपास करत आहेत.

COMMENTS