Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संविधान अमृत महोत्सव वर्षानिमित्ताने संविधान दिंडीचे आयोजन

सातारा / प्रतिनिधी : दि. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताची स्वतंत्र राज्य घटना अंगिकृत आणि अधिनियमित करुन सदरची राज्य घटना दि. 26 नोव्हेंबर 1950 पासून अ

सातारच्या त्रिशंकू भागातील पथदिवे दोन दिवसापासून बंद
खटाव तालुक्यात गौण खनिज उत्खनन प्रकरणी जेसीबीसह दोन ट्रॅक्टरवर कारवाई
अण्णासाहेब चिरमुले पुरस्कार नाम फौंडेशन यांना जाहीर

सातारा / प्रतिनिधी : दि. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताची स्वतंत्र राज्य घटना अंगिकृत आणि अधिनियमित करुन सदरची राज्य घटना दि. 26 नोव्हेंबर 1950 पासून अंमलात आली आहे. या घटनेस 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने भारतीय राज्य घटनेबाबत जागरुकता, घटनात्मक अधिकार व कर्तव्याबद्दल सर्व नागरिकामध्ये जागरुकता वाढविण्यासाठी या वर्षात संविधान अमृत महोत्सव घर-घर संविधान हा उपक्रम राबवून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती समाज कल्याण आयुक्त सुनील जाधव यांनी दिली.
राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची व्यावसायीक महाविद्यालये, शैक्षणिक संकुले, शासकीय वसतिगृहे, शासकीय निवासी शाळा त्याचबरोबर शासन मान्यता प्राप्त अनुदानित /विनाअनुदानित / स्वयंअर्थसहाय्यित शाळा, आश्रमशाळा व वसतिगृहे तसेच ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था तसेच महाराष्ट्र विधान परिषद व विधानसभा अशा सर्व ठिकाणी विविध उपक्रम व कार्यक्रमांतर्गत दि. 20 नोव्हेंबर 2025 ते 26 जानेवारी 2026 या कालावधीत विविध स्पर्धा / उपक्रम / कार्यक्रमाचे विशेष आयोजन करण्यात येणार आहे.
बुधवार, दि. 26 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 8.15 वा. छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल, राजवाडा, सातारा ते नगरपरिषद चौकामधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळा अशी संविधान दिंडी आयोजित करण्यात आली आहे. सातारा शहरातील शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी व नागरीकांनी संविधान दिंडीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांनी केले आहे.

COMMENTS