Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपचे माजी नगरसेवक एल. एन. शहा यांचा राष्ट्रवादी (एसपी) मध्ये प्रवेश

ईश्‍वरपूर / प्रतिनिधी : भाजपाचे जेष्ठ नेते, माजी नगरसेवक एल. एन.शहा व त्यांचे चिरंजीव भाजपाचे शहर उपाध्यक्ष उमेश रायगांधी यांनी माजी मंत्री आ.

विजयस्तंभ अभिवादनसाठी उत्तर प्रदेशहून मुस्लिम बांधव
तासवडे टोल नाक्यावर 7 कोटी 53 लाखाचे सोन्या-चांदीचे दागिणे जप्त
फोटो शूट करताना दरीत गाडी कोसळली; तरूण गंभीर जखमी

ईश्‍वरपूर / प्रतिनिधी : भाजपाचे जेष्ठ नेते, माजी नगरसेवक एल. एन.शहा व त्यांचे चिरंजीव भाजपाचे शहर उपाध्यक्ष उमेश रायगांधी यांनी माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष स्व. अशोकदादा पाटील यांचे चिरंजीव, उरूण सेवा सोसायटीचे अध्यक्ष महेश पाटील, भाजपाचे माजी विरोधी पक्षनेते विजय कुंभार, तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, माजी नगरसेवक खंडेराव जाधव, ज्येष्ठ नेते बी. ए. पाटील, माजी नगराध्यक्ष पै. भगवान पाटील, मुनीर पटवेकर, अरुणादेवी पाटील, महिला शहराध्यक्ष पुष्पलता खरात प्रामुख्याने उपस्थित होते.
आ.पाटील म्हणाले, माजी नगरसेवक एल. एन. शहा यांनी शहरातील नागरिकांची चांगली सेवा केली आहे. ते आमचेच होते. पुन्हा स्वगृही आले आहेत. त्याचा आम्हास मनस्वी आनंद होत आहे. आज एक मंत्री म्हणाले, आमच्या लोकांना साथ द्या, शहरातील पिण्याचे पाणी, गटारी आदी प्रश्‍न मार्गी लावू. मग त्यांनी गेली 9 वर्षे शहराचे प्रश्‍न का सोडविले नाहीत? अनेक तरुण कार्यकर्ते संपर्कात आहेत. येत्या काही दिवसात तेही निर्णय होतील. महेश पाटील व विजय कुंभार यांना ओढण्याचा प्रयत्न झाला. मात्र, ते ठामपणे आमच्या बरोबर आहेत.
एल. एन. शहा म्हणाले, आम्ही पूर्वी आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे. आता पुन्हा स्वगृही आल्याचा आनंद आहे. मी गेली 40 वर्षे विरोधी पक्षात काम केले. मात्र, त्यांना आता आमची अडचण वाटते. या शहराचा विकास करावयाचा असेल, या शहरातील नागरिकांना चांगल्या सोई-सुविधा द्यायच्या असतील, तर ते आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालीच होऊ शकते. आम्ही मनात कोणताही स्वार्थ न ठेवता त्यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेला आहे.
महेश पाटील म्हणाले, हे शहर चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांच्या हातात जाऊ द्यायचे नाही. त्यांच्या विरोधातील लढाई आम्ही साहेबांच्या नेतृत्वाखाली लढू आणि जिंकू. साहेबांनी गृहमंत्री असताना अनेक जेल बांधले आहेत. साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाल्यावर यातील बरेच लोक त्या जेलमध्ये जातील. आता आपण उमेदवारीवरून कोणतेही रुसवे-फुगवे न ठेवता आनंदराव मलगुंडेदादा यांना 10 हजारांनी विजयी करण्यासाठी जीवाचे रान करूया. माझ्या वडिलांचे आपल्यातील अनेक कुटुंबाशी जिव्हाळ्याचे ऋणानुबंध होते, ते जपण्याचे काम करू.

COMMENTS