कोरोनाच्या काळात फडणवीस हे राज्यातील सामान्य माणसांच्या जीवाला जीव देवून, प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालुन कोरोनाच्या संकटाने घाबरलेल्या जनतेला अधार देण्याचे काम करीत आहेत.
कोपरगाव शहर प्रतिनिधी- कोरोनाच्या काळात फडणवीस हे राज्यातील सामान्य माणसांच्या जीवाला जीव देवून, प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालुन कोरोनाच्या संकटाने घाबरलेल्या जनतेला अधार देण्याचे काम करीत आहेत.आज अनेक नेते, मंत्री घरात बसुन जपुन काम करीतआहेत मात्र फडणवीस यांनी संकटाळात प्रशासनावर नजर ठेवून त्यांना जागे करीत, सामान्य माणसांचे जीव वाचवण्यासाठी राज्यभर दौरे करून काम करीत आहेत. माणुसकीच्या नात्याने जनतेला आज आधाराची गरज आहे. करोना योध्दा म्हणून काम करणाऱ्यांना बळ देत त्यांना लागणारी मदत करण्याचे काम फडणवीस उत्तम करीत आहेत.सोमवारी दुपारी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे आपल्या नियोजित दौऱ्यावर असताना कोपरगाव येथील कोल्हे साखर कारखाना कार्यस्थळावर जावून माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांची सदिच्छा भेट घेतली, यावेळी श्री कोल्हे पुढे म्हणाले, सध्या एकमेकावर टिका करण्याची ही वेळ नाही.करोनाच्या संकटाने बाजारपेठा ठप्प झाल्याने आर्थीक उलाढाल मंदावली,व्यापारी आडचणीत आहे.बेरोजगारी वाढली,करोनाने अनेकांचे कंबरडे मोडले. शाररीक व नैसर्गिक संकटाने शेतकरी आडचणीत असल्याने केंद्र व राज्य सरकारमध्ये अशावेळी समन्वय असणे गरजेचे आहे,एकमेकावर चिखलफेक करण्याची वेळ नाही.सरकारने एकमेकांच्या हातात हात घालून काम करावे.आशा संकटाच्यावेळी खऱ्या नेतृत्वाची कस लागते.जनतेत जावुन काम करणारे अभ्यासु नेते म्हणजे फडणवीस यांची ख्याती आहे. अभ्यासपूर्ण निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात आहे म्हणुनच त्यांच्या सरकारच्या काळात ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागु देता.मराठा आरक्षण मुंबई उच्च न्यायालयात ठिकवुन दाखवले. त्यानंतर सध्याचे राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात कमी पडल्याने मराठा समाजाचे मोठे नुकसान झाले. असेही कोल्हे म्हणाले. कोल्हे फडणवीस यांच्यातील चर्चा अनेकवेळ विविध विषयावर रंगल्या. माजी आमदार स्व.गंगाधरराव फडणवीस यांच्या सहवासातील आठवणींना यावेळी उजाळा मिळाला. राज्यासह देशात करोनाच्या संसर्गाने तरुणाईचा बळी जातोय. अनेकांचे आयुष्य करोनाने उध्वस्त केले असले तरी माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी वयाच्या ९३ वर्षी करोनावर विजय मिळवून आज खंभीरपणे आपले दैनंदिन कामे करत असल्याचे पाहुन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस अचंबित झाले. आणि त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांना कळाले की, माजीमंत्री कोल्हे यांना काही दिवसापूर्वी करोना संसर्ग झाला होता. त्यांना उपचारासाठी विविध ठीकाणी दाखल केले होते. त्यांच्या वयोमानानुसार करोनातून ते केव्हा बरे होतील या विवंचनेत अनेकजण गर्क होते मात्र कोल्हे यांची इच्छाशक्ती प्रबळ असल्याने ते करोनाचा पराभव करीत सुखरुप बरे झाले आणि ९३व्या वर्षात असताना अनेक व्याधीनी घेरलेले असुनही करोनातुन मुक्त होवून शंकरराव कोल्हे यांचा आदर्श सर्वांना घेण्यासारखा आहे.अशी भावना फडणवीस यांनी व्यक्त करुन कोल्हे यांचे अभिनंदन केले.ते पुढे म्हणाले की, आजही या वयात माजी मंत्री शंकरराव कोल्हे राजकीय,सामाजीक,सहकारातील कामे करताय हे पाहुन आम्हाला प्रेरणा मिळते असे म्हणत कोल्हे यांच्या शाररिक तंदुरुस्तीचे गमक कोल्हे यांच्याकडून जाणुन घेतले. यावेळी शंकरराव कोल्हे यांनी फडणवीस यांच्या कार्याचे कौतुक करीत ते म्हणाले की, माझ्या दिर्घ आयुष्याचे गमक कोरफड आहे. सध्याचा काळ कठीण आहे या संकटात सर्वांनी काळजी घ्यावी कोणीही घाबरु जावू नका. मी वयाच्या ९३ वर्षी करोनावर मात करुन उभा आहे.तुम्हीही धाडसाने उभे राहुन या संकटाचा सामना करा.आहार, आरोग्य व व्यायामाकडे लक्ष द्यावे असा वडीलकीचा सल्ला सर्वांना कोल्हे यांनी दिला. दरम्यान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे माजी मंत्री शंकरराव कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे व संजीवनी शैक्षणिक संस्थेचे कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे यांनी स्वागत करुन आभार व्यक्त केले..
” गेल्या ४० वर्षापासून माजी मंत्री शंकरराव कोल्हे हे कोरफड खातात. सकाळ संध्याकाळ कोरफड हे त्यांचे आवडीचे खाद्य आहे. आयुर्वेदात कोरफडीचे महत्त्व सांगितले जाते पण कोल्हे यांनी कोरफड खावून त्याचे महत्त्व ९३ वर्षी स्वतःच्या तंदुरुस्ती वरुन पुन्हा सिध्द केले. पचनासह इतर शाररीक लाभ देणारी कोरफड कोल्हे यांच्यासाठी वरदान ठरली”
COMMENTS