Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महावितरणच्या बोल्हेगाव कक्ष कार्यालयाचे संचालक राजेंद्र पवार यांच्या हस्ते उद्घाटन

अहिल्यानगर : अहिल्यानगर शहर तथा ग्रामीण विभागअंतर्गत असलेल्या शहर उपविभाग २ मधील सावेडी व भिस्तबाग शाखा कार्यालयाचे विभाजन करून नवीन बोल्हेगाव शा

पदभरतीसाठी दिव्यांगांचे वैश्विक ओळखपत्र अनिवार्य
पूजा खेडकरला 26 सप्टेंबरपर्यंत अटकेपासून दिलासा
आरोग्य सेवेतील उमेदवारांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते नियुक्ती आदेश
Displaying 1000351949.jpg

अहिल्यानगर : अहिल्यानगर शहर तथा ग्रामीण विभागअंतर्गत असलेल्या शहर उपविभाग २ मधील सावेडी व भिस्तबाग शाखा कार्यालयाचे विभाजन करून नवीन बोल्हेगाव शाखा कार्यालय निर्माण करण्यात आले आहे. नागापूर भागात असलेल्या या शाखा कार्यालयाचे फित कापून उद्घाटन महावितरणच्या मानव संसाधन विभागाचे संचालक राजेंद्र पवार यांनी गुरुवार दिनांक ४ सप्टेंबर रोजी केले. 

यावेळी नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे, अधीक्षक अभियंता रमेशकुमार पवार, कार्यकारी अभियंते योगेश चव्हाण, लक्ष्मण काकडे, प्रदीप वट्टमवार, अजय भंगाळे, कौस्तुभ डबीर आणि अतिरिक्त कार्यकारी अभियंता भाऊसाहेब कुमावत यांचेसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. वाढती ग्राहक संख्या आणि ग्राहकांना अखंडित सेवा देण्यासाठी मुख्य कार्यालयाने दिलेल्या प्रशासकीय मान्यतेनुसार सदर कक्ष कार्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे.  नागापूर भाग येथे भैरवनाथ बोरुडे हॉस्पिटल शेजारी असलेल्या बोल्हेगाव नवीन शाखेचे कार्यालय असून आस्थापनेवर १९ पदे मंजूर करण्यात आली आहेत. या कार्यालयअंतर्गत बोल्हेगाव, नागापूर व सावेडी या परिसरातील जवळपास १६ हजार ग्राहकांना या कार्यालयातून सेवा दिली जाणार आहे. अहिल्यानगरमधील वाढते शहरीकरण, ग्राहक संख्या आणि विजेची वाढती मागणी यानुसार अहिल्यानगर शहर उपविभाग २ मधील सावेडी व भिस्तबाग शाखा कार्यालयाचे विभाजन करून नवीन बोल्हेगाव शाखा कार्यालय निर्माण करण्यात आले आहे. यामुळे परिसरात ग्राहकांना आणखी तत्पर, अखंडित व गतिमान सेवा देण्यास मदत होणार आहे.

COMMENTS