Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विकास ही न थांबणारी व निरंतर चालणारी प्रक्रिया – छगन भुजबळ

नाशिक : विकास ही न थांबणारी व निरंतर चालणारी प्रक्रिया; अनेक आपत्तीचा सामना करत शासन आपल्यास्तरावर विविध विकासांची काम करीत असते. कोरोनासारखे संक

ऑगस्ट क्रांतीदिनी मिळाले देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला मुख्य वळण – छगन भुजबळ
आपल्या राष्ट्रीय खेळाचा दुष्काळ भारतीय संघाने संपवला- छगन भुजबळ
ओबीसींची स्वतंत्र जनगणना करून घटनात्मक आरक्षण द्या : छगन भुजबळ यांची मागणी

नाशिक : विकास ही न थांबणारी व निरंतर चालणारी प्रक्रिया; अनेक आपत्तीचा सामना करत शासन आपल्यास्तरावर विविध विकासांची काम करीत असते. कोरोनासारखे संकट किंवा नैसर्गिक आपत्तीच्या काळातही विकासकामे सुरू ठेवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून आपण प्रयत्न करीत आहोत. अशा परिस्थीतीतही न थाबंता विकासकामे या पुढेही नियमित सुरू राहतील, असे प्रतिपादन पालक मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

भुजबळ यांच्या हस्ते आज येवला मतदारसंघात निफाड तालुक्यातील ब्राम्हणगांव विंचूर व मुखेड येथे एकूण १ कोटी ९२ लक्षच्या विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन पार पडले. त्यावेळी पालकमंत्री भुजबळ बोलत होते. यावेळी मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, जिल्हा परिषद सभापती संजय बनकर, येवला बाजार समितीचे प्रशासक वसंत पवार यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले की, कोरोनामुळे विकास कामे काही काळ थांबली होती. परंतू आता पुन्हा एकदा विकासाची कामे सुरू झाली असून रखडलेली सर्व कामे पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. या विकास कामासाठी लागणारा आवश्यक निधी शासनस्तरावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर सोळागाव पाणी पुरवठा योजनेबाबत पाणी पुरवठा मंत्र्यांसमवेत बैठक घेण्यात येवून, हा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यासाठी योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच शिवनदी स्वच्छतेबाबत शासनास प्रस्ताव सादर करण्यात आलेला असून हा प्रश्न देखील मार्गी लागेल, असेही पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजीवन हळूहळू सुरळीत होत आहे. नाशिक जिल्हा ऑक्सिजन निर्मितीत स्वयंपूर्ण होत असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक पाच पट ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यावेळी प्रथमतः नागरिकांचे जीव वाचविण्यास शासनाने प्राधान्य दिले असून, नागरिकांचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी व कोरोनाच्या सर्व नियमावलीचे पालन करून प्रत्येकाने आपले कुटुंब सुरक्षित राहील याची खबरदारी घ्यावी, असे आवाहनही पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी केले आहे.

मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर म्हणाले की, मतदार संघात विविध विकासाची कामे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. येथील महत्वाचा प्रश्न असलेल्या सोळागाव पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून नूतनीकरणाचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासन दरबारी मांडण्यात आलेला आहे. तसेच शिवनदी स्वच्छते बाबत नुकतीच समिती कडून पाहणी करण्यात आली असून लवकरच याबाबत निर्णय होऊन हा प्रश्न मार्गी लागेल असे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगेश गवळी यांनी तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.किशोर गवळी यांनी केले.

COMMENTS