Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पिंपळगाव उज्जैनी मध्ये विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व झाडांचे रोप देऊन स्वागत

अहिल्यानगर :- येथील नवजीवन प्रतिष्ठान समन्वयीत व कमिन्स इंडिया फाउंडेशन अर्थसहाय्यित मॉडेल व्हिलेज प्रकल्प पिंपळगाव उज्जैनी येथे जिल्हा परिषद प्

उस्माननगर परिसरात रमजान ईद  उत्साहात साजरी
श्रीमती प्रज्ञा वाळकेंसाठी इतकी उदारता का?
तिरुका येथील संपादित जमिनीवर महामार्गाचे काम सुरू
Displaying IMG_6080.JPG

अहिल्यानगर :- येथील नवजीवन प्रतिष्ठान समन्वयीत व कमिन्स इंडिया फाउंडेशन अर्थसहाय्यित मॉडेल व्हिलेज प्रकल्प पिंपळगाव उज्जैनी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवसाच्या निमित्ताने आयोजित स्वागतोत्सवात वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन व सेंद्रिय शेती याबद्दल माहिती देत गुलाब पुष्प, आंबा, शेवग्याचे रोप तसेच पुस्तके, गणवेश व बूट भेट देऊन स्वागत करण्यात आले.
नवजीवन प्रतिष्ठानचे उदय पवार, पिंपळगाव उज्जैनीच्या सरपंच शांताबाई आढाव, मुख्याध्यापक रावसाहेब पिंपळे, पर्यावरण प्रेमी नवजीवन चे अमित गायकवाड, दिपक बत्तिशे, ग्रामस्थ, विद्यार्थी व शिक्षक यावेळी उपस्थित होते.
यावेळी पर्यावरण प्रेमी अमित गायकवाड यांनी पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना आपल्या दैनंदिन जीवनामधील झाडांचे महत्त्व, झाडाशी मैत्री, संगोपन व पर्यावरण संरक्षण कसे करावे याबद्दल माहिती दिली. झाडे आपल्याला फुले, फळे, औषध, ऑक्सिजन, सावली देतात. त्याचबरोबर झाडांमुळे पाऊस पडण्यास मदत होते. त्यामुळे आपण सर्वांनी झाडांशी मैत्री करून त्यांचे जतन व संवर्धन केले पाहिजे असे ते म्हणाले. यावेळी पिंपळगाव उज्जैनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, आंब्याचे रोप, शेवग्याची रोप तसेच पुस्तके गणवेश व बूट देऊन स्वागत करण्यात आले.
प्रारंभी सर्व विद्यार्थ्यांची सजविलेल्या ट्रॅक्टर मधून फेरी व वृक्षदिंडी काढण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. भगवान राऊत यांनी सूत्रसंचालन केले. तर उदय पवार यांनी आभार मानले.

COMMENTS