Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दोन आठवडे आधीच मान्सून दाखल, स्वागतार्ह!

गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेले नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनचे राज्यात रविवारी म्हणजे काल २५ में रोजी आगमन झाले. हवामान खात्याकडून र

घोडेगावच्या पाणी टाकीच्या जागेचा निर्णय ग्रामसभेतच होणार
हेल्पिंग हॅण्ड्सचे भैय्या बॉक्सर यांचा महात्मा गांधी मानवता पुरस्काराने गौरव
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत न दिल्यास आंदोलन छेडणार

गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेले नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनचे राज्यात रविवारी म्हणजे काल २५ में रोजी आगमन झाले. हवामान खात्याकडून रविवारी यासंदर्भातील अधिकृत घोषणा करण्यात आली. कालच मान्सून  केरळात दाखल झाला होता. त्यानंतर मान्सून महाराष्ट्रात पोहोचण्यासाठी एक ते दोन दिवस जातील, असा अंदाज होता. मात्र, महाराष्ट्रात मान्सूनसाठी अत्यंत पोषक स्थिती असल्याने अवघ्या काही तासांमध्ये मान्सून राज्यात दाखल झाला आहे.  आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या लवकर मान्सून दाखल झाल्याचा विक्रम पाहायला मिळतोय. यापूर्वी फक्त तीन वेळा म्हणजे १९५६,६२ आणि ७१ मध्ये आठवडाभर आधी म्हणजे २९ मे रोजी राज्यात मान्सून दाखल झाला होता. त्यामुळे २५ मे रोजी मान्सून दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे. १९५६  साली प्रथमच २९ मे रोजी राज्यात मान्सून दाखल झाला होता.  १९६२ मध्ये देखील २९ में रोजी लवकर मान्सून दाखल झाला होता. तर, १९७१ ला देखील २९ मे रोजी लवकर मान्सू दाखल झाला होता.  साधारणपणे ७ जूनच्या आसपास राज्यात मान्सून दाखल होतो. मात्र, यंदा मान्सून तब्बल १२ दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल झाला आहे. मान्सूनची एकूण आगेकूच पाहता पुढील काही तासांमध्ये महाराष्ट्रात सर्वत्र  दाखल होईल, असा अंदाज आहे. काल सकाळपासून मुंबई, उपनगर आणि ठाणे परिसरात ढगाळ वातावरणासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मान्सूनचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यातील बहुतांश शेतकरी हे खरिपाच्या शेतीसाठी मान्सूनच्या पावसावर अवलंबून असतात. त्यामुळे मान्सूनच्या आगमानाने शेतकरी सुखावले आहेत. तसेच मान्सून आल्याने गेल्या दोन-तीन महिन्यांपासून उकाड्याचा सामना करणाऱ्या सर्वसामान्यांनीही सुटकेचा निश्वास टाकला आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. हवामान विभागाकडून पुढील ४८ तासांसाठी २० जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील शेती देखील अजूनही बऱ्याच अंशी पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने बारा दिवस आधी पावसाळ्याला सुरुवात झाल्यामुळे शेतकरी समाज निश्चितपणे आनंदित झालेला आहे. अर्थात, पावसाने केलेलं हे लवकर आगमन, अगदी प्रमाणबद्ध पावसासाठी आदर्श ठरावं, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. कारण, बऱ्याच वेळा पाऊस खूप आधी जर सुरू झाला आणि नंतर जर ताण बसला, तर, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची ही पाळी येते. अशावेळी शेतकरी आर्थिक संकटातही सापडतो.  शेतकऱ्यांची मशागतही वाया जाते. खर्च आणि श्रम या दोन्ही गोष्टी वाया गेल्यामुळे शेतकरी हवालदिल होतात आणि दुसऱ्या बाजूला दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते. परंतु, आपण अपेक्षा करूया की यावर्षी दोन आठवडे आधीच मान्सूनला सुरुवात झाल्यामुळे आपण या पावसाचं स्वागत करून निसर्गाच्या शेतीमध्ये मशागत करून आनंद व्यक्त करूया.

COMMENTS