Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आ.लंघे यांच्या निधीतून, महंत भास्करगिरी महाराज यांच्या हस्तेमुरमे ते प्रवरासंगम रस्तेकामास प्रारंभ

सोनई : नेवासेचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या वैकुंठवासी किसनगिरी बाबा यांची तपोभूमी मौजे मुरमे येथील प्रवर

स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले अभिवादन
मिटकरींचे आरोपीच्या अटकेसाठी आंदोलन
१४ व्या राष्ट्रीय सबज्युनीअर चॉकबॉल स्पर्धेचे उद्घाटन थाटात संपन्न 
Displaying langhe.jpg

सोनई : नेवासेचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या वैकुंठवासी किसनगिरी बाबा यांची तपोभूमी मौजे मुरमे येथील प्रवरासंगम रोड ते तपोभूमी कडे जाणारा रस्ता खडीकरण व काँक्रिटीकरण या कामाचे भूमिपूजन देवगड संस्थानचे महंत ह.भ.प.भास्करगिरीजी महाराज यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील प्रमुख उपस्थित होते.
 यावेळी बोलताना आ.विठ्ठलराव लंघे म्हणाले किसनगिरी बाबा यांच्या तपोभूमी मुरमे गावाच्या रस्ताचे काम करण्याचे भाग्य आज मला मिळाले आहे. नेवासा तालुक्यातील गोर गरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मला जनतेचे विधानसभेत पाठवले आहे. लोकशाही मध्ये पाच वर्ष आपण तालुक्यातील राहिलेले प्रलंभीत प्रश्न सोडवणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी महंत भास्करगिरीजी महाराज यांनी आमदार लंघे यांचे कौतुक करत पुढील कार्यासाठी आशीर्वाद दिले. यावेळी देवगड येथील सरपंच अजय साबळे, राजेंद्र मते, शिवाजीराव मते पाटील, बाबासाहेब मुरदारे, संदीप साबळे, अर्जुन वरखडे, रमेश गणगे, बबन लंघे, दिलीप दरोडे, प्रवीण लंघे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सयाम आदी मान्यवर, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

COMMENTS