Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अकोलेत दारूबंदी शासकीय समितीची स्थापना

अकोले  : तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.१६) शासकीय दारूबंदी समितीची स्थापना करण्यात आली. तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी या समितीची स

राष्ट्रीय लोक न्यायालयात ७०४ कोटींची प्रकरणे निकाली
पारंपरिक लावणीची पताका फडकवत ठेवा. :- प्रा. डॉ. शेषराव पठाडे
शरद पवारांचा आमदार सुनील शेळकेंना इशारा

अकोले  : तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.१६) शासकीय दारूबंदी समितीची स्थापना करण्यात आली. तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी या समितीची स्थापना करून पहिली बैठक बोलावली. तहसीलदार यांनी सुरुवातीला पोलिस व उत्पादन शुल्क विभागाच्या कारवायांची माहिती घेतली. त्यात वारंवार गुन्हे दाखल झालेल्या विक्रेत्यांवर आणखी कठोर कारवाई होण्यासाठी काय करता येईल यावरही सर्व अधिकाऱ्यांनी चर्चा केली.या समितीत गटविकास अधिकारी, अकोले व राजूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक, उत्पादन शुल्क अधिकारी आणि अशासकीय सदस्य म्हणून दारूबंदी चळवळीचे समन्वयक हेरंब कुलकर्णी यांचा समावेश करण्यात आला आहे.
 अशासकीय सदस्य हेरंब कुलकर्णी यांनी ज्या दुकानातून ही दारू आणली जाते, ती माहिती घेऊन त्या लायसन धारक दुकानावर कारवाई करण्याची गरज आहे असे म्हटले. पुढील एका महिन्यात तालुक्यातील सर्व प्रमुख गावांत ग्रामरक्षक दल स्थापन होतील. यात पंचायत समिती प्रशासन पुढाकार घेईल, असा ठराव समितीने  मंजूर केला आहे. तसेच दर महिन्याला समितीची बैठक घेण्यात येईल व दारूबंदीबाबत आढावा घेतला जाईल, असे ठरले.  धाड पडण्यापूर्वी अवैध  विक्रेत्यांना माहिती मिळते. याबाबत अधिकारी यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी यावेळी केली गेली. समिती सदस्य गटविकास अधिकारी अमर काळे, अकोले पोलिस निरीक्षक मोहन बोरसे, राजूर सहायक
पोलिस निरीक्षक दीपक सरोदे, उत्पादन शुल्क निरीक्षक सुनील सहस्रबुद्धे, अशासकीय सदस्य कुलकर्णी व भरारी पथक सदस्य यावेळी उपस्थित होते. पोलिस निरीक्षक मोहन बोरसे यांनी शुक्रवारी तालुक्यातील अवैध दारू विक्रेते यांना पोलिस स्टेशनला बोलावून घेत त्यांचे प्रबोधन केले. दारूविक्री बंद न केल्यास कडक कारवाईचा इशारा दिला. यावेळी अनेकांनी आमचे पुनर्वसन करावे, आम्ही या व्यवसायातून बाहेर पडू अशी इच्छा व्यक्त केली.

COMMENTS