Homeताज्या बातम्यासंपादकीय

शरद पवारांची ‘पुलोद’ दलित नेत्याविरूध्दचे षडयंत्र होते!

आरक्षण आंदोलनातील न्यायतंत्र हरवले !
वीज कर्मचारी संप आणि….. 
पलटीबाज नितिशकुमार ! 
महाराष्ट्राचे राजकारण १९६० पासून मराठा समुदायाच्या ताब्यातच राहीले; याचे मुख्य कारण, मराठा समाज हा सत्यशोधक चळवळीतून प्रामुख्याने जागृत झाला होता. त्यांचं काँग्रेसमध्ये संघटनात्मक विलीनीकरण झाल्यापासून महाराष्ट्राची राजकीय सत्ता त्यांच्या हातात आहे. या काळामध्ये ओबीसी समुदाय हा पूर्णपणे दुर्लक्षित होता; तर, आंबेडकरी राजकारण हे केवळ चळवळीच्या स्वरूपातच यादरम्यान महाराष्ट्रामध्ये होत राहिले. यादरम्यान मराठेतर नेतेही मुख्यमंत्री पदावर आले. या नावांची जर आपण यादी पाहिली तर, आपल्याला साधारणपणे मारुतीराव कन्नमवार, वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक, बॅरिस्टर ए आर अंतुले, मनोहर जोशी, सुशील कुमार शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे ही नावे महाराष्ट्रात मराठेतर मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांची नावे आहेत. मुख्यमंत्रीपदाची टर्म पूर्ण करणाऱ्या नेत्यांमध्ये मराठेतर नेत्यांमध्ये खास करून वसंतराव नाईक आणि देवेंद्र फडणवीस ही दोनच नावे राहीली. १९७८ मध्ये शरद पवार हे प्रथमच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले, आणि आज पावेतो महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून असण्याचे रेकॉर्ड त्यांच्या नावे आहे. शरद पवार यांनी त्या काळात पुलोद म्हणजे पुरोगामी लोकशाही दल नावाने एक आघाडी तयार केली. या आघाडीत त्यांना अनेक आमदार येऊन मिळाले. वसंतदादा पाटील यांना सत्तेतून बाहेर करत त्यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली. वसंतदादा पाटील यांना पदावरून दूर करण्यापेक्षा, या काळामध्ये सर्वात महत्त्वाचं कारण होतं की, महाराष्ट्राच्या राजकीय सत्तेत वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री असले तरी, खरी सत्ता महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री म्हणून नाशिकराव तिरपुडे या दलित नेत्याकडेच होती. नाशिकराव तिरपुडे हे महाराष्ट्राचे पहिलेच उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्या काळापासूनच हे पद निर्माण करण्यात आलं. कारण, तत्पूर्वी वसंतदादा पाटील हे आणीबाणी नंतर विभाजित झालेल्या इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस यापैकी रेड्डी काँग्रेसचे भाग होते. महाराष्ट्र विधानसभेच्या जेव्हा निवडणुका झाल्या त्यानंतर दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या. तर, त्या दोन्ही काँग्रेसच्या एकत्रितरणातून मुख्यमंत्रीपदी इंदिरा गांधी यांच्या गटाचा नेता ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु इंदिरा गांधी यांनी निष्ठावंत आणि कर्तृत्ववान नाशिकराव तिरपुडे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रयत्न इंदिरा गांधींनी केला. परंतु, मराठा राजकारणाच्या दबावात असलेले महाराष्ट्राचे सत्ताकारणाने त्यांना मुख्यमंत्री होऊ न देण्यात, महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. वसंतददा पाटील यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली; मात्र, ही बाब  उपमुख्यमंत्री असणाऱ्या नाशिकराव तिरपुडे  इंदिरा इंदिरा गांधींचे निष्ठावंत असल्यामुळे त्यांचा सत्तेत प्रभाव होता. नेमकी ही बाब मराठा सत्ताकरणाला रुचणारी नव्हती. त्यामुळे या सत्ताकारणाने शरद पवार यांच्या भोवती यशवंतराव चव्हाण यांच्या आशिर्वादाने एकत्रित येत वसंतदादा पाटील यांची सत्ता उलथवली! पण, तसं म्हणण्याऐवजी खरे तर ती नाशिकराव तिरपुडे यांची सत्ता उलथवली. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये मधल्या काळात बॅरिस्टर ए आर अंतुले हे मुख्यमंत्री झाले. बॅरिस्टर ए आर अंतुले हे महाराष्ट्राचे एकमेव असे मुख्यमंत्री आहेत की, ज्यांची निर्णय क्षमता आणि कर्तृत्व शक्ती अतिशय ऊर्जावान होती. आज ज्या काही लाडक्या बहिणींच्या आणि इतर कुठल्याही मदतीच्या योजना आहेत, याची खरी संकल्पना संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून बॅरिस्टर  अंतुले यांनी निर्माण केली.  महाराष्ट्राच्या सत्ताकारणात त्यांना न झालेल्या घोटाळ्याच्या माध्यमातून घेरण्यात आलं आणि इंदिरा प्रतिष्ठानच्या नावे न झालेला सिमेंट घोटाळा त्यांच्या नावावर खपवण्यात आला.  तह हयात त्यांना या खटल्यात गुंतवणूक ठेवण्यात आलं की, जेणेकरून ते पुन्हा मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये येणार नाही. मनोहर जोशी आणि देवेंद्र फडणवीस हे दोन ब्राह्मण मुख्यमंत्री झाले. त्यापैकी देवेंद्र फडणवीस पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे गैर मराठा नेते आहेत. राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर एकमेव दलित नेतृत्व म्हणून जर कोणी आलं तर ते सुशीलकुमार शिंदे. सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसला विधानसभा निवडणुकांमध्ये यशही मिळालं. परंतु, स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्याभोवती ज्या पद्धतीने राजकारण एकवटलं त्यातून सुशील कुमार शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची दुसरी टर्म भेटू शकली नाही. २०१४ नंतरचे जे राज्याचे राजकारण आहे, ते तसे पाहिले तर युती आघाडीचे असले तरी ते अस्थिर आहे. कारण या काळात उद्धव ठाकरे यांना देखील अडीच वर्षे मिळाली. सलग साडेसात वर्षे राज्यात मराठा मुख्यमंत्री नव्हता. हा सगळा काळ जर वगळला तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर मराठा नेतृत्व राहिलं.  या नेतृत्वांनी मराठेतर समाजाला राज्याच्या सत्ता कारणापासून वेगळे कसे करता येईल, हा लॉबी अंतर्गत धोरणात्मक भाग अदृश्य म्हणून राजकारणात कायम राहिला. आजही तो दिसतो आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुत्सद्दी, सक्षम आणि ताकतवर मुख्यमंत्री असतानाही मराठा राजकारण सत्ताकारणाच्या अनुषंगाने त्यांना घेरू पाहते आहे. परंतु, चाणाक्ष मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस या गोष्टींना बधणारे नाहीत. आणि हीच आजच्या मराठा सत्ताकारणातील राजकारणाची सर्वात मोठी अडचण आहे.

COMMENTS