Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यातील पुरंदर विमानतळाचा वाद चिघळणार; ड्रोन सर्व्हे बंद पाडणार्‍या शेतकर्‍यांवर होणार कारवाई

सासवड / प्रतिनिधी : पुरंदर तालुक्यात होणार असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी शुक्रवार, दि. 2 रोजी सुरू झालेला ड्रोन सर्व्हे स्थानिक शेतकर्‍या

नगरविकास आराखड्या विरोधात मेढ्यात शेतकर्‍यांचे आंदोलन; प्रास्तावित आराखडयाची होळी
कोरोनाने माता-पिता छत्र हरपलेल्यांना माणच्या शिक्षकांची भरीव मदत
खाद्य पदार्थ पॅकींगसाठी वृत्तपत्राचा वापर टाळण्याचे आवाहन

सासवड / प्रतिनिधी : पुरंदर तालुक्यात होणार असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी शुक्रवार, दि. 2 रोजी सुरू झालेला ड्रोन सर्व्हे स्थानिक शेतकर्‍यांनी बंद पाडला. सरकारच्या वतीने मोठा फौजफाटा मागविण्यात आला होता. तरी देखील स्थानिकांनी प्रचंड विरोध करत ड्रोन सर्व्हे बंद पाडला. परंतू, सर्व्हे पूर्ण झाला असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
पुरंदर तालुक्यातील एखतपूर-मुंजवडी या गावातून हा सर्व्हे सुरू करण्यात आला होता. या वेळी ‘जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’, ‘जय जवान जय किसान’, ‘या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय’ अशा घोषणा देण्यात आल्या. जमिनीची मोजणी करण्यासाठी शासनाने ड्रोन सर्व्हेचा निर्णय घेतला होता. यानंतर येथील ग्रामस्थांनी या ड्रोन सर्व्हेला विरोध केला होता. तरीही प्रचंड फौजफाट्यासह सर्व्हे सुरू करण्यात आला होता.
पुरंदर तालुक्यात मागील आठ वर्षांपासून या आंतरराष्ट्रीय विमानतळाची प्रक्रिया सुरू आहे. मागील पाच वर्षांत हे विमानतळ दुसर्‍या जागेवर नेण्यात येणार, असे सांगण्यात येत होते. मात्र, मागील चार महिन्यांपासून या विमानतळाच्या भूसंपादन प्रक्रियेला आता वेग आला आहे. जुन्याच म्हणजे पारगाव मेमाणे, खानवडी, एखतपूर, मुंजवडी, वनपुरी, खानवडी, कुंभारवळण या गावांमध्ये हे विमानतळ होणार आहे. या भागातील लोकांकडून विमानतळाला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे.
पोलीस आणि विमानतळ बाधित शेतकरी यांच्यात मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला. शेतकर्‍यांनी या ड्रोन सर्व्हेला तीव्र विरोध केला. स्थानिक लोकांचा पुरंदर विमानतळासाठी तीव्र विरोध असताना देखील सरकार या विमानतळ निर्मितीवर ठाम आहे. मागील महिनाभरात स्थानिक लोकांनी दोन आंदोलने केली होती. मात्र, सरकारकडून कोणताही प्रतिसाद या शेतकर्‍यांना मिळाला नाही. त्यामुळे येथील शेतकरी संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले.
आज एखतपूर या गावचा ड्रोन सर्व्हे पूर्ण झाला आहे. ड्रोन ही शासकीय मालमत्ता आहे. काही शेतकर्‍यांनी या ड्रोनचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. तसेच शासकीय कामात अडथळा आणला. याप्रकरणी जे दोषी आढळतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
वर्षा लांडगे (उपविभागीय अधिकारी, पुरंदर)

COMMENTS