प्रहार संघटनेच्या पाठपुराव्यामुळे गरिबाला मिळाला निवारा

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

प्रहार संघटनेच्या पाठपुराव्यामुळे गरिबाला मिळाला निवारा

आदिवासी कुटुंबाला प्रहार ने मिळवून दिले हक्काचे घर आणि रेशन कार्ड दि १४ मे रोजी कोपरगाव तालुक्यातील करंजी गावांमध्ये एक आदिवासी कुटुंब मोलमजुरी करण्यासाठी बाहेर गेले असता त्यांच्या झोपडी

वनपरिक्षेत्रच्या कार्यालयाची अवस्था स्थलांतरित बिबट्यासारखीच ः नितीन शिंदे
BREAKING: हॉस्पिटल मध्ये मृत शवांची हेळसांड! पहा ‘LokNews24’ | Coronavirus Death
पुणतांब्यात कापूस चोरणारा अटकेत

कोपरगाव शहर प्रतिनिधी- आदिवासी कुटुंबाला प्रहार ने मिळवून दिले हक्काचे घर आणि रेशन कार्ड दि १४ मे रोजी कोपरगाव तालुक्यातील करंजी गावांमध्ये एक आदिवासी कुटुंब मोलमजुरी करण्यासाठी बाहेर गेले असता त्यांच्या झोपडी ला आग लागली त्या आगीत त्यांचा संपूर्ण संसार कपडे रोख रक्कम तेवीस हजार रुपये घरातील सर्व अन्नधान्य जळून खाक झाले कुटुंब उघड्यावर पडले त्यावेळी तत्काळ प्रहारचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय शिंदे  यांनी घटनास्थळी जात आदिवासी कुटुंबाला भेटून एक महिना पुरेल इतका किराणा व धान्य भाजीपाला दिले पण त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न तसाच होता त्यांनी प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजीत  पोटे यांना या घटनेची हकीगत कळवली त्यांनी तात्काळ कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांना दूरध्वनीवरून संपर्क साधत अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्या कुटुंबाची तात्काळ निवाऱ्याची सोय करून त्यांना नवीन रेशन कार्ड व रेशन धान्य उपलब्ध करून शासनाची मदत घेऊन पक्क्या निवाऱ्याची सोय करावी अशी विनंती करत निवेदनही पाठवले या वर कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे  यांनी अतिशय तत्परतेने कुटुंबाला अन्नधान्य पाठवून दोन दिवसात नवीन रेशन कार्ड देऊन शासन दरबारी पक्के घर बांधण्यासाठी अनुदान मिळेपर्यंत घर उभा करण्यासाठी बल्ल्या,बांबू, ताडपत्री साहित्य देऊन लगेच निवाऱ्याची तात्पुरती सोय केली. यातून  तहसीलदार योगेश चंद्रे हे अतिशय कार्यतत्पर व कर्तव्यनिष्ठ अधिकारी असल्याचा चांगला अनुभव या घटनेतून परत एकदा तालुक्याला आला आहे.
 या कुटुंबाला अनुदान मिळेपर्यंत प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय शिंदे, तालुकाध्यक्ष संदीप शिरसागर व शहर प्रमुख दिपक पठारे शासन दरबारी पाठपुरावा करणार आहेत

COMMENTS