Homeताज्या बातम्यासंपादकीय

“जेएनयू’त डाव्यांचे फसवे राजकारण!

 देशातील शिक्षण, संशोधन आणि वैचारिक संघर्षात अग्रस्थानी असलेल्या जवाहर नेहरू विद्यापीठ अर्थात, जेएनयू च्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत पुन्हा

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत
बिबट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा : सतीश पाटील
ओबीसींना पूर्णपणे डावलून विधानसभा लढताहेत सत्ताधारी आणि विरोधकही!

 देशातील शिक्षण, संशोधन आणि वैचारिक संघर्षात अग्रस्थानी असलेल्या जवाहर नेहरू विद्यापीठ अर्थात, जेएनयू च्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा डाव्यांनी वर्चस्व सिद्ध केले. त्यांनी एकूण चारपैकी तीन जागांवर विजय मिळवून आपली शक्ती दाखवली. परंतु, डाव्या आणि उजव्या विद्यार्थी संघटनांत संघर्ष आणि धूसफूस सतत होवूनही निवडणूक काळात मात्र, या संघटनांचे अंतर्गत राजकारण अधिक रहस्यमय बनते. याच विद्यापीठात बिरसा, आंबेडकर विद्यार्थी संघटना अर्थात, बापसा या विद्यार्थी संघटनेला डावलण्याचा प्रयत्न देखील डाव्या विद्यार्थी संघटनांच्या राजकारणातून करण्यात आला आहे. त्यांच्या या राजकारणामुळे ओबीसी, दलित – आदिवासी या विद्यार्थ्यांच्या एकजुटीच्या संघटनांना विद्यापीठीय राजकारणात बाद करण्याचे प्रयत्न केले जातात. त्यातूनच न‌ऊ वर्षांत एबीव्हीपी या विद्यार्थी संघटनेच्या प्रतिनिधीला निवडून आणले गेले आहे. अर्थात, एबीव्हीपी ला मिळालेला विजय हा डाव्यांनी तीन जागा घेऊन चौथी उजव्यांना बहाल करण्याचा योजनाबध्द निवडणुकीचा भाग आहे, असे आता स्पष्ट होऊ लागले आहे. या निवडणुकीत स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया, डेमोक्रॅटिक स्टुडंट्स फेडरेशन, प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स असोसिएशन, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन,  बिरसा आंबेडकर फुले स्टुडंट्स असोसिएशन, एबीव्हीपी आदी संघटनांनी निवडणुकीत सहभाग घेतला. डावे पक्ष फुटले, अभाविपने एकट्याने निवडणूक लढवली यावेळी जेएनएसयू निवडणुकीत डाव्या आघाडीत फूट दिसून आली. ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन आणि डेमोक्रॅटिक स्टुडंट्स फेडरेशन  यांनी एकत्र निवडणुका लढवल्या, तर एस‌एफ‌आय आणि ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन  यांनी बिरसा आंबेडकर फुले स्टुडंट्स असोसिएशन आणि प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स असोसिएशन  सोबत युती केली. एआय‌एस‌एफचे नितीश कुमार यांनी अध्यक्षपद जिंकले आहे. डेमोक्रॅटिक स्टुडंट्स फेडरेशन  च्या मनीषा यांनी उपाध्यक्षपद जिंकले आणि मुन्ताहा फातिमा यांनी सरचिटणीसपद जिंकले. एआय‌एस‌एफ आणि डीएस‌एफ यांनी एकत्र निवडणूक लढवली. दरम्यान, एबीव्हीपीचे वैभव मीणा  संयुक्त सचिवपदी निवडून आले. जेएनएसयू निवडणुकीसाठी २५ एप्रिल रोजी मतदान झाले. रविवारी रात्री उशिरापर्यंत मतमोजणी झाल्यानंतर निकाल जाहीर करण्यात आले. जेएनयू निवडणूक आयोगाच्या मते, सुमारे ७० टक्के मतदान झाले. ७,९०६ विद्यार्थ्यांपैकी सुमारे ५,५०० विद्यार्थ्यांनी मतदान केले. जेएनएसयूच्या निवडणुका आधी ८ एप्रिल रोजी होणार होत्या, परंतु कॅम्पसमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे २५ एप्रिल रोजी मतदान झाले होते.  गेल्या वर्षी झालेल्या जेएनएसयू निवडणुकीत डाव्यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि संयुक्त सचिव या चारही जागा जिंकल्या होत्या. अभाविपला पराभवाचा सामना करावा लागला होता.  यावेळी, त्यांनी एका जागेवर विजय मिळवला; परंतु, ही जागा डाव्यांनी त्यांना बहाल केल्याचा डाव्यांवर आरोप होतोय. डावे एका बाजूला उजव्या संघटनांशी संघर्ष करण्याचा देखावा करित असले तरी फुले – आंबेडकरी विचारांच्या विद्यार्थी संघटनेला डावलण्याचा प्रयत्न केला आहे.

COMMENTS