Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमामुळे वाचनसंस्कृती हरवत  चालली : प्राचार्य डॉ. बबन चौरे

पाथर्डी : पुस्तक वाचनाने मनुष्याच्या व्यक्तीमत्वात प्रचंड बदल होतो.पुस्तके प्रेरणा तर देतातच परंतु ती खरी ज्ञानाची स्त्रोत आहेत.इलेक्ट्रॉनिक प्रस

शहरातील 4200 घरांमध्ये डेंग्यू डासाच्या अळ्या
एक कोटीचा अवैध मद्यसाठा जप्त
23 रोजी नांदेड येथे  सर्वधर्मीय सामुहिकविवाह मेळावा 
Displaying IMG_20250423_182312.jpg

पाथर्डी : पुस्तक वाचनाने मनुष्याच्या व्यक्तीमत्वात प्रचंड बदल होतो.पुस्तके प्रेरणा तर देतातच परंतु ती खरी ज्ञानाची स्त्रोत आहेत.इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमे, इंटरनेट व मोबाईलच्या अतिवापरामुळे वाचन कमी होत असून वाचनसंस्कृती हरवत चालली आहे.आज ई बुकची मुले वाचन करतात हा दावा केला जातो परंतु त्यात तथ्य नसून छापील पुस्तके वाचनात जो आनंद आहे तो ई बूक मध्ये नाही असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बबन चौरे यांनी केले. ते येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयात जागतिक पुस्तक दिनानिमित्त ग्रंथालय विभाग आयोजित ‘मी पुस्तक बोलतोय’ या कार्यक्रमात बोलत होते. व्यासपीठावर ग्रंथपाल डॉ किरण गुलदगड, पर्यवेक्षक प्रा. सलीम शेख उपस्थित होते. 

पुढे बोलताना डॉ चौरे म्हणाले, जगात झालेल्या प्रत्येक सकारात्मक बदलांमध्ये महापुरुषांची चरित्रे असून या महापुरुषांच्या चारीत्रांमधून बोध घेऊन जगात अनेक क्रांत्या झाल्या आहेत.आजपासून प्रत्येकाने महिन्याला एक तरी पुस्तक वाचण्याचा संकल्प करावा.पुस्तकामध्ये आयुष्य बदलून टाकण्याची क्षमता आहे.थोर नाटककार व साहित्यिक विल्यम शेक्सपियर आणि इंका गार्सिलासो यांच्या स्मरणार्थ युनेस्कोने २३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला.जगभरातील १०० पेक्षा जास्त देशांमध्ये हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. पुस्तके आपल्याशी नेहमी एकरूप होतात. पुस्तक वाचनाने जो ब्रम्हानंद मिळतो तो इतर कशानेही मिळत नाही. गुगल गुरु चा आधार घेऊन मिळविलेले ज्ञान कधीही परिपूर्ण नसते. पुस्तकासारखा जगात कोणताही दुसरा मित्र नाही. पुस्तके कधीही धोका देत नाहीत. प्रत्येक शाळा महाविद्यालयातून मुलांना दररोज एक तास मुक्तपने वाचन करण्याचा आनंद मिळावा. त्यांना त्यावेळी त्यांच्या आवडीची पुस्तके मिळावीत. प्रत्येक शाळा, महविद्यालयात पुस्तक प्रदर्शन आयोजित करणे, आवडीच्या लेखकांची व्याख्याने, मुलाखती आयोजित करणे, त्यांना बोलते करणे गरजेचे आहे असे ते शेवटी म्हणाले. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी मी पुस्तक बोलतोय या आत्मचरित्रात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये महाविद्यालयाच्या प्रतीक्षा गर्जे, शिरसे मारिया, साधना पवार, प्रियांका लोखंडे, साक्षी सांगळे यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सलीम शेख, सुत्रसंचालन कु ऋतुजा रोडे तर आभार प्रा. सचिन पालवे यांनी मानले.

COMMENTS