Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रोहित- सुर्या चमकले ; मुंबईला आलेख वधारला

सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा यांच्या शानदार भागीदारीमुळे मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जचा नऊ गडी राखून पराभव केला. आयपीएल मधील विकेट्सच्य

टी-20 विश्‍वचषकाचे सामने मोफत दिसणार
राहुलच्या शानदार खेळीमुळे दिल्लीची बंगळुरूत धूम
महिला टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा

सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा यांच्या शानदार भागीदारीमुळे मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जचा नऊ गडी राखून पराभव केला. आयपीएल मधील विकेट्सच्या बाबतीत मुंबईचा हा दुसरा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी सन २००८ मध्ये वानखेडेवर सीएसकेचा नऊ गडी राखून पराभव केला होता आणि आता १७ वर्षांनंतर मुंबईने या पराक्रमाची पुनरावृत्ती केली आहे. मुंबईचा आयपीएल मधील सर्वात मोठा विजयही सीएसके विरुद्धच आहे. सन २०२० मध्ये मुंबईने चेन्नईचा दहा गडी राखून पराभव केला.                  प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने २० षटकांत ५ बाद १७६ धावा केल्या, पण रोहित आणि सूर्यकुमार यांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केल्यामुळे मुंबईने १५.४ षटकांतच एक बाद १७७ धावा करून सामना जिंकला. मुंबईसाठी प्रभावी खेळाडू म्हणून आलेल्या रोहित शर्माने ४५ चेंडूंत चार चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने नाबाद ७६ धावा केल्या, तर सूर्यकुमार यादवने ३० चेंडूंत सहा चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने नाबाद ६८ धावा केल्या.                    मुंबईचा हा आठ सामन्यांमधला चौथा विजय असून आठ गुणांसह ते गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आले. मुंबईने गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सला (केकेआर) मागे टाकले आहे. आता सातव्या स्थानावर घसरले आहेत.  त्याच वेळी, सीएसकेला आठ सामन्यांत सहाव्या पराभवाला सामोरे जावे लागले आणि ते गुणतालिकेत तळाशी कायम आहेत. गुजरात टायटन्स गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. आपल्या शानदार फलंदाजीच्या जोरावर रोहितने शिखर धवनला मागे टाकले आणि आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू बनला. या स्पर्धेत रोहितच्या आता ६७८६ धावा झाल्या आहेत. फक्त विराट कोहलीच रोहितच्या पुढे आहे ज्याने आयपीएलमध्ये ८३२६ धावा केल्या आहेत. धवनच्या आयपीएलमध्ये ६७६९ धावा आहेत आणि आता तो या यादीत तिसऱ्या स्थानावर घसरला आहे.                     लक्ष्याचा पाठलाग करताना रायन रिक्लेटन आणि रोहितने मुंबईला चांगली सुरुवात करून दिली. या दोन फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी केली. मुंबईला पहिला धक्का रिक्लेटनच्या रूपाने बसला जो १९ चेंडूत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २४ धावा काढून बाद झाला. मागील काही सामन्यांप्रमाणे या सामन्यातही मुंबईने रोहितचा प्रभावशाली खेळाडू म्हणून वापर केला. रोहित काही काळ खराब फॉर्ममधून जात होता, मात्र या सामन्यात तो वेगळ्याच लयीत दिसला. रोहितने मोसमातील पहिले अर्धशतक ३३ चेंडूत पूर्ण केले आणि फॉर्ममध्ये जोरदार पुनरागमन केले. सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करणाऱ्या सूर्यकुमार यादवने रोहितला चांगली साथ दिली. सूर्यकुमारने अवघ्या २६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर सूर्यकुमार वेगळ्या गियरमध्ये दिसला. सूर्यकुमार आणि रोहितने सोळावे षटक टाकण्यासाठी आलेल्या मथिशा पाथिरानाचा सामना केला आणि तीन षटकार मारून सामना जिंकला. सूर्यकुमार आणि रोहितमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ११४ धावांची नाबाद भागीदारी झाली. आयपीएलच्या या मोसमातील मुंबईसाठी ही सर्वात मोठी भागीदारी आहे. सीएसकेसाठी एकमेव यश रविंद्र जडेजाने मिळविले.                     तत्पूर्वी, मुंबईने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रविंद्र जडेजा आणि शिवम दुबे यांच्या अर्धशतकांच्या जोरावर सीएसकेने मुंबई इंडियन्ससमोर १७७ धावांचे लक्ष्य ठेवले.  जडेजाने ३५ चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ५३ धावा केल्यानंतर नाबाद राहिला. प्रथम फलंदाजी करताना सीएसकेची सुरुवात चांगली झाली नाही कारण त्यांनी रचिन रविंद्रची विकेट लवकर गमावली जो नऊ चेंडूत पाच धावा करून बाद झाला. यानंतर पहिला सामना खेळत असलेल्या आयुष म्हात्रेने शानदार फलंदाजी करत पॉवर प्लेपर्यंत मुंबईला दुसरे यश मिळू दिले नाही.                      म्हात्रेला शेख रशीदने चांगली साथ दिली आणि सीएसकेची धावसंख्या ५० च्या पुढे गेली. तथापि, दिपक चहरने सीएसकेला त्यांची दुसरी विकेट मिळवून दिली, १५ चेंडूत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ३२ धावा केलेल्या म्हात्रेला बाद केले. त्यानंतर रशीदही २० चेंडूत १९ धावा करून डग आऊटमध्ये परतला. सीएसकेचा डाव अडचणीत आला, मात्र शिवम दुबेसह जडेजाने डावावर ताबा मिळविला.                     या दोन फलंदाजांनी चौथ्या विकेटसाठी ७९ धावांची भागीदारी करत सीएसकेची धावसंख्या १४० च्या पुढे नेली. यादरम्यान दुबेने ३० चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले, मात्र ३२ चेंडूत दोन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने पन्नास धावा करून तो बाद झाला. त्यानंतर धोनी आला जो चार धावा करून बाद झाला. शेवटी जडेजाने शानदार फलंदाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. आयपीएलच्या १४ डावांनंतर जडेजाचे हे पहिलेच अर्धशतक ठरले. जडेजाच्या मदतीनेच सीएसकेला १७५ धावांचा टप्पा ओलांडता आला. तीन चेंडूंत एका चौकाराच्या मदतीने चार धावांवर जेमी ओव्हरटन नाबाद राहिला. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने २ तर दीपक चहर, अश्विनी कुमार आणि मिचे पकडल सँटनरने प्रत्येकी एक बळी घेतला.                     विद्यमान आयपीएलची सालाबाद प्रमाणे पराभवानेच सुरूवात करणाऱ्या मुंबईची सलामीच्या सामन्यात चेन्नईनेच बोळवण केली होती. पण त्यानंतर चेन्नईचे ताबूत अक्षरशः डुबले व ते गुणतालिकेत शब्दशः तळाला घसरले. पण मुंबईने हार जितीच्या लपंडावानंतर आता विजयाचा सरळ मार्ग पकडला असून हळूहळू गुणतालिकेत स्वतःचा आलेख चांगल्या कामगिरीने उंचावला तर आहेच पण प्ले ऑफच्या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली आहे. अपयशाने सुरुवात व नंतर चढता आलेख हि मुंबई इंडियन्सची खासियत आहे आणि आता त्याची पुनरावृत्ती होत असून सहावे विजेतेपद लोड आहे असे संकेत मिळू लागले आहेत.  @ डॉ.दत्ता विघावे  

COMMENTS