लोणी : लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल
लोणी : लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या प्रवरा स्पर्धा परीक्षा केंद्रातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या वर्ग क (क्लर्क टायपिस्ट ) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला या परीक्षेत नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या प्रवास स्पर्धा परीक्षा केंद्रातील छाया उधान, विजय गायधने, सोनाली खोबरे आणि रावसाहेब घोरपडे यांची निवड झाली आहे.अशी माहीती संस्थेचे शिक्षण संचालक डाॅ.प्रदिप दिघे यांनी दिली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शासकीय आणि निम शासकीय सेवेत संधी मिळाव्यात या उद्देशाने संस्थेने प्रवरा परिसरातील विद्यार्थ्यांसाठी प्रवरा स्पर्धा परीक्षा केंद्र आणि प्रवरा अभ्यासिका सुरू केल्या आहेत. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना तज्ञ मार्गदर्शक आणि विविध सेवा सुविधा या केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जातात. मोफत संदर्भ पुस्तकांची सुविधा मुलाखतीचे तंत्र या विषयावरती सविस्तर माहिती तज्ञाच्या माध्यमातून या केंद्रातून दिली जाते.संस्थेच्या माध्यमातून विविध महाविद्यालयामध्ये प्रवरा स्पर्धा परीक्षा केंद्र आणि पोलिस भरती केंद्र कार्यरत आहे.यांचा ग्रामीण विद्यार्थ्यांना चांगला फायदा होत आहे आज पर्यंत या केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विविध विद्यार्थी हे शासकीय आणि निम शासकीय सेवेमध्ये रुजू झाल्याचे समन्वयक डाॅ. शैलेश कवडे- देशमुख यांनी सांगितले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि जलसंपदा मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, माजी खा.डाॅ. सुजय विखे पाटील, संस्थेचे सहसचिव भारत घोगरे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुश्मिता विखे पाटील, संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, संस्थेचे शिक्षण संचालक डॉ प्रदीप दिघे, आश्वी कॉलेजचे कॅम्पस संचालक डाॅ. महेश खर्डे, पद्मश्री विखे पाटील कॉलेजचे कॅम्पस डाॅ. आर.ए. पवार, कोल्हार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिभाऊ आहेर, राहता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोमनाथ घोलप,प्लेलमेंट विभागाचे डाॅ.मनोज परजणे,डाॅ.शैलेश कवडे-देशमुख यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
COMMENTS