श्रीरामपूर : अतिरीक्त पाणी निर्माण करून गोदावरीचे तुटीचे खोरे दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्पाला गती देण्याचे प्राधान्य राज्य सरकारचे असून
श्रीरामपूर : अतिरीक्त पाणी निर्माण करून गोदावरीचे तुटीचे खोरे दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्पाला गती देण्याचे प्राधान्य राज्य सरकारचे असून, केंद्रात आणि राज्यात जनतेच्या मनातील सरकार असल्याने लोकाभिमुख निर्णयातून विकास प्रक्रीया अधिक वेगाने सुरू असल्याचे प्रतिपादन जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
तालुक्यातील पढेगाव येथे सुमारे १२ कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ तसेच ग्रामपंचायतीने सुरू केलेल्या लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील वाचनालयाचे उद्घाटन मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.यानिमित्ताने मंत्री विखे पाटील यांची पुस्तक तुला करून ग्रामस्थांच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास आणि सबका प्रयास या मंत्राने संपूर्ण देशात विकासाची प्रक्रीया सुरू आहे.प्रत्येक निर्णय आणि योजना लोकाभिमुख असून, योजनामुळे शहर आणि ग्रामीण भागातील लोकांमध्ये परिवर्तन येत असल्याचे त्यांनी सांगितले.
मागील दहा वर्षात विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या चांगल्या निर्णयामुळे देशातील जनतेन त्यांना तिसर्यांदा पंतप्रधान होण्याची संधी दिली. लोकसभा निवडणुकीत खोटा प्रचार करून जनतेची दिशाभूल केली गेली.पण संविधनात कोणताही बदल न करता उलट देशामध्ये संविधान दिन साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पंतप्रधान मोदीनी घेतला असल्याचे विखे पाटील म्हणाले.
देशामध्ये संविधानच्या आधारावर विकासाची प्रक्रीया सुरू असून केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेत त्याचे प्रतिबिंब ठळकपणे दिसत असल्याकडे लक्ष वेधून, देशातील ८०टक्के लोकांंना मोफत धान्य,पीक विमा योजना लाडकी बहीण योजना महात्मा फुले आरोग्य योजनेचा निधी पाच लाख रुपयांपर्यत करण्याचा निर्णय महायुती सरकारने केला असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
पढेगाव ग्रामपंचायतीने सुरू केलेले वाचनालय हे लोकशिक्षणाचे मंदीर व्हावे आशी अपेक्षा व्यक्त करून,समाज सोशल मिडीयात कितीही अडकला तरी वाचना शिवाय पर्याय नाही.कृत्रिम बुध्दीमतेचे मोठे आव्हान आपल्या समोर येत आहे.या वाचनालयातून स्पर्धा परीक्षांचे केंद्र सुरू करा, यासाठी लागणारे संगणक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मंत्री विखे पाटील यांनी दिले.
तालुक्यातील लाख कालव्याच्या दुरुस्तीच्या कामाच्या सूचना विभागातील अधिकार्यांना दिल्या असून यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून दिला जाईल आशी ग्वाही देवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे.जिल्ह्यातील भंडारदारा धरणात अतिरिक्त पाणी निर्माण करणे,मुळा धरणातील गाळ काढून उंची वाढवणे या कामाला गती देण्यात येणार असून नदीजोड प्रकल्पाची काम पूर्ण करण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
वळदगाव येथे श्री.कालभैरवनाथ मंदिरात मंत्री विखे पाटील यांनी अभिषेक केला.गावातील शुध्द पाण्याच्या केंद्राचे उद्घाटन तसेच जलजीवन मिशनच्या योजनेच्या कामाला निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या. याप्रसंगी नानासाहेब शिंदे नानासाहेब पवार दिपक पठारे भाजपा तालुका अध्यक्ष बाबासाहेब चेडे रामराव शेटे सरपंच किशोर बनकर सरपंच महेश खरात सरपंच पुष्पा भोसले यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS