Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आदिनाथ सहकारी साखर कारखाना निवडणूक ; अजिनाथ हजारे विजयी

जामखेड : आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाच्या निवडणुकीत जामखेड तालुक्यातील  बारा गावातून  विधानपरिषदेचे सभापती प्रा . राम शिंदे   यांचे

शेतकरी संघटना विधानभवनावर धडकली ; कांद्याचे 20 टक्के निर्यात शुल्क हटवा
विद्यार्थ्यांनो, पुस्तके वाचा, स्वतःला सक्षम बनवा : उपमुख्यमंत्री अजित पवार
बॅटरी वॅट क्षमतेमध्ये बदल केलेल्या ईव्ही बाईक्सवर कारवाई: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
Displaying IMG-20250421-WA0100.jpg

जामखेड : आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाच्या निवडणुकीत जामखेड तालुक्यातील  बारा गावातून  विधानपरिषदेचे सभापती प्रा . राम शिंदे   यांचे जवळा येथील कट्टर समर्थक ज्योती क्रांती सोसायटीचे उपाध्यक्ष दशरथ हजारे यांनी मोठे मताधिक्य मिळवत विजय मिळवला आहे.

      आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जामखेड तालुक्यातील जवळा, नान्नज, सह बारा गावे येतात. या कारखान्याचे जामखेड तालुक्यात तीन हजार सभासद या बारा गावांतील आहेत.  ही निवडणुक कारमाळ्याचे आमदार नारायण पाटील आणि माजी आमदार संजय शिंदे यांच्या पॅनल  मध्ये झाली, यामध्ये आमदार पाटील यांचे सर्व उमेवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले. यामध्ये आमदार पाटील यांचे जवळा येथिल उमेदवार दशरथ हजारे यांनी तब्बल ७ हजार ९३३ मतांनी निवडून आले. चोंडी येथील विलास जगदाळे यांचा  दारुण पराभव केला. हजारे यांच्या विजयासाठी  जामखेड तालुक्यातील भाजपाची  संपूर्ण यंत्रणा कामाला लागली होती.  हजारे हे विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे  समर्थक आहेत भाजपा व कार्यकत्यांनी हजारे यांच्या विजयासाठी मोठे प्रयत्न केले. 

हजारे यांच्या विजयासाठी जामखेड  बाजार समितीचे सभापती शरद कार्ले , मधुकर राळेभात, सरपंच सुशील आव्हाड, उपसरपंच प्रशांत शिंदे, बापूराव ढवळे, सोमनाथ पाचरणे, रवि  सुरवसे,युवा नेते अक्षय वाळुंजकर,पांडुरंग उबाळे , उदयसिंह पवार,डॉ. पांडुरंग हजारे, सरपंच बाबा महारनवर , उमेश रोडे ,डाॅ किसन राऊत, राहुल पाटील ,प्रशांत पाटील, नितीन कोल्हे,अमोल हजारे,मारुती रोडे,विष्णु हजारे,रामलिंग हजारे,अतुल शिंदे ,सरपंच दत्तात्रय शिंदे , शिवराज देवमुंडे , सरपंच राम पवार , अंबादास पवार , पांडुरंग हजारे,पुरुषोत्तम वाळुंजकर, किरण वर्पे,राजेंद्र राऊत, अभय नाळे, मुरलीधर हजारे ,अय्युब शेख, संतराम सुळ, अविनाश ढवळे,सुखदेव मते,पांडुरंग उबाळे,अशोक  देवकर,करण ढवळे,ओमासे,महेंद्र मोहळकर, अनिल हजारे,सतिष शिंदे, जालिंदर चव्हाण,बाळासाहेब मते, डाॅ बोराटे, बाळासाहेब चव्हाण, यांनी प्रयत्न केले.  मी सर्वसामान्य शेतकर्‍यांचा मुलगा असल्याने जामखेड तालुक्यातील बारा गावांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेणार असल्याचे नवनिर्वाचित संचालक, (आदिनाथ सहकारी साखर कारखाना) दशरथ हजारे यांनी सांगितले. 

 – – – – – – – – –

जामखेड तालुक्यातील बारा गावांतील शेतक-यांना आदिनाथ  सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून हक्काचा साखर कारखाना उपलब्ध आहे. जामखेड तालुक्यातील बारा गावांतील दशरथ हजारे यांच्या माध्यमातून ऊस उत्पाद‌क शेतकऱ्यांना नक्कीच न्याय मिळेल. राम शिंदे, सभापती, विधान परिषद

COMMENTS