Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छत्रपती शिवाजी कॉलेजच्या तीन खेळाडूंना राज्य शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर

सातारा / प्रतिनिधी : रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज साताराच्या तीन आंतर राष्ट्रीय विजेत्या खेळाडूना महाराष्ट्र शासनाचा मानाचा शिवछत्रपती

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती; राज्य निवडणूक आयोगाचा महत्वपूर्ण निर्णय
सर्वोदय कारखाना सभासदांच्या मालकीचा करणार : निशिकांत भोसले-पाटील
विकास कामांमुळे कॉलर उडविणार्‍यांचा लोकसभेला पराभव : सारंग पाटील

सातारा / प्रतिनिधी : रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज साताराच्या तीन आंतर राष्ट्रीय विजेत्या खेळाडूना महाराष्ट्र शासनाचा मानाचा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला. महाराष्ट्रातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
यामध्ये छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये बी. ए. द्वितीय वर्षात शिकणारा जागतिक विजेता, अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू ओजस देवतळे याला राज्य क्रीडा थेट प्रस्कार जाहीर झाला. त्याने जर्मनी आणि फ्रांस येथील जागतिक अर्चारी स्पर्धेत भारताला प्रथमच विजेतेपद मिळवून दिले. त्याने मागील वर्षी चीन येथे झालेल्या एशियन गेम्समध्ये 3 सुवर्ण पदके मिळविली आहेत. नुकत्याच अमेरिका येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत त्याने भारतीय संघाला कांस्य पदक मिळवून दिले आहे. सन 23-24 या वर्षी त्याला प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्काराने सम्मानीत करण्यात आले आहे. याच कामगिरीच्या जोरावर त्याला थेट पुरस्कार जाहीर झाला आहे.
कु. संस्कृती मोरे हि पॅराअ‍ॅथलिट असून सन 2023-24 मध्ये चीन येथे झालेल्या पॅराएशियन गेम्समध्ये तिने बुध्दीबळमध्ये भारतातर्फे सांघिक कांस्य पदक मिळविले. महाराष्ट्र शासनाने तिला विशेष क्रीडा कार्यकारी अधिकारी वर्ग 1 या पदावर नियुक्ती केली असून तिला मनाचा शिव छत्रपती पुरस्कार (अंध-बुध्दिबळ) जाहीर करून सम्मान केला आहे.
तिसरा शिवछत्रपती पुरस्कार आंतर राष्ट्रीय खेळाडू पृथ्वीराज पाटील याला जाहीर झाला आहे. त्याने अनेक आंतर राष्ट्रीय रग्बी स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून पदके मिळविली आहेत. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री महोदय यांच्या उपस्थितीत पुरस्कारांचे वितरण शुक्रवार, दि. 18 एप्रिल रोजी शिवछत्रपती क्रीडा संकुल, पुणे येथे होणार आहे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशामुळे छ. शिवाजी कॉलेज, रयत शिक्षण संस्था आणि कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोविला आहे.

COMMENTS