Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

म्हसवडमध्ये भरदिवसा डॉक्टरांच्या घरात बंदुकीच्या धाकाने दरोडा

म्हसवड / वार्ताहर : शहरातील शांततेला हादरा देणारी घटना मंगळवार, दि. 15 रोजी दुपारी घडली. डॉ. नरेंद्र पिसे यांच्या घरात बुरखाधारी तिघांनी भरदिवस

फलटणला होणारे राष्ट्रीय सामने यशस्वी पार पडतील : श्रीमंत रामराजे
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी प्रतितास 1200 भाविकांना प्रवेश
राजारामबापू कारखान्यातर्फे ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षणास महिला रवाना

म्हसवड / वार्ताहर : शहरातील शांततेला हादरा देणारी घटना मंगळवार, दि. 15 रोजी दुपारी घडली. डॉ. नरेंद्र पिसे यांच्या घरात बुरखाधारी तिघांनी भरदिवसा शिरकाव करून बंदुकीच्या धाकाने घरातील ऐवज लुटला. या थरारक प्रकारामुळे म्हसवड शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटना डॉ. खरात हॉस्पिटल शेजारी असलेल्या डॉ. पिसे यांच्या बंगल्यात घडली. दुपारी तीनच्या सुमारास पिसे दाम्पत्य हॉस्पिटलमध्ये असताना घरात त्यांच्या सूनबाई व लहान बाळ होते. याच वेळी बुरख्यांनी झाकलेले तिघे चोर घरात शिरले व सूनबाई व बाळाला एका खोलीत कोंडले. सूनबाईंनी प्रसंगावधान राखून डॉ. आकाश पिसे यांना फोन करून माहिती दिली. संभाषण चोरांच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी घरातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. सूनबाईंनी मुख्य दरवाजा बंद केल्यामुळे चोरटे मागच्या दरवाजाने बाहेर पडले. पळून जाण्याच्या घाईत चोरट्यांनी सूनबाईने गाडीची चावी काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी बंदुकीचा धाक दाखवत तेथून पलायन केले.
घटनेची माहिती मिळताच म्हसवड पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. श्‍वानपथक व ठसे तज्ज्ञांची मदत घेण्यात येत असून, सपोनि अक्षय सोनवणे या प्रकरणाचा तपास करत आहेत. शहरात भरदिवसा घडलेल्या या दरोड्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांसमोर गुन्हेगारांना पकडण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

COMMENTS